MNS : राज ठाकरेंचे पुत्र आजपासून मराठवाडा दौऱ्यावर

आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर सध्या सर्व पक्ष हे कामाला लागले आहेत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील जोषात ऍक्टिव्ह मोड दिसत आहे.

MNS : राज ठाकरेंचे पुत्र आजपासून मराठवाडा दौऱ्यावर

raj thackeray and amit thackeray

आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर सध्या सर्व पक्ष हे कामाला लागले आहेत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील जोषात ऍक्टिव्ह मोड दिसत आहे. इतके दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे स्वतः दौरा करत होते परंतु आता यांचे पुत्र तथा मनसे विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सुद्धा आजपासून ऍक्टिव्ह मोड मध्ये दिसून येणार आहेत.

आज अमित ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ६ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर असा दहा दिवसांचा त्यांचा दौरा असणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथून सुरु होणारा दौरा औरंगाबादला संपणार आहे. या दरम्यान अमित ठाकरे हे पक्षाच्या बैठका, विध्यार्थी सेनेचे बांधणी करणार आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता मराठवाड्यातील मनसैनिकांसाठी हा दौरा महत्वाचा ठरणार आहे. पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे प्रयत्न करत आहेत. यासाठी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांशी बोलून पक्ष बांधणीवर ते लक्ष देण्याचे काम मनसे मार्फत केले जात आहे.

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत या दौऱ्याची माहिती दिली आहे. ज्यात ‘येतोय नवनिर्माणाची वाज्रमुठ बांधण्यासाठी, महासंपर्क अभियान सहावा टप्पा,’असा उल्लेख करण्यात आला आहे. तर दौऱ्याची सुरवात उस्मानाबाद जिल्ह्यातून होणार असून, ज्यात 6 ऑक्टोबर तुळजापूर, 7 ऑक्टोबर उस्मानाबाद, ८ ऑक्टोबर लातूर, ९ ऑक्टोबर नांदेड, १० ऑक्टोबर हिंगोली, ११ ऑक्टोबर परभणी, १२ ऑक्टोबर बीड, १३ ऑक्टोबर जालना, १४ – १५ ऑक्टोबर औरंगाबाद असा हा दौरा असणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) आपल्या हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर आता ॲक्टिव मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. २३ ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर २३ ऑगस्टला मनसेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. त्यांनतर राज ठाकरे यांनी हळू हळू प्रत्येक विभागात दौरा करणाया सुरवात केली आहे. आणि आता त्यांचे सुपुत्र देखील मराठवाडा दौरा कर्ण आहेत.

हे ही वाचा:

IND vs SA 1st ODI: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे संकट

शिमग्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नाही – देवेंद्र फडणवीस

‘… आपल्याला कोणी वाली नाही’ – अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version