“कुणीही आम्हाला गृहीत धरू नये”- मनसे आमदार राजु पाटील

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव उमेदवार राजू पाटील यांनी नेमकं आपलं मत कुणाला दिलं यावरून सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत. 

“कुणीही आम्हाला गृहीत धरू नये”- मनसे आमदार राजु पाटील
विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान सुरु असून या बाबत आता अनेक चर्चा दिसून येत आहेत. मतदानाचा आता शेवटचा १ तास उरला आहे. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव उमेदवार राजू पाटील यांनी नेमकं आपलं मत कुणाला दिलं यावरून सर्वत्र चर्चा सुरू झाल्या आहेत.
राज्यसभा निवडणुकीवेळी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन भाजपला मतदान करण्याती मागणी केली होती. या निवडणुकीतही प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज ठाकरेंनी मला सांगितले आहे कोणाला मतदान करायचे आहे असे आमदार राजू पाटील म्हणाले.
मागच्या वेळी आम्ही व्यक्ती बघून मतदान केले होते. लोकशाहीमध्ये मतदान हे पवित्र कर्तव्य असून तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं असेल की एका मताची किंमत किंवा ते मत किती महत्वाचं असतं. परंतू यावेळी आम्ही भाजपला मतदान करणार आहोत की अन्य दुसऱ्या पक्षाला हे आता कुणीही गृहित धरु नये.” असं राजू पाटील म्हणाले. विधानभवनात आल्यावर विधानपरिषदेच्या मतदानासाठी आल्यावर राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांना ही प्रतिक्रिया दिली. त्यामूळे ते चर्चेत आहेत.
विधान परिषद निवडणुकीत एक-एक मत महत्वाचे आहे. त्यामुळे नवाब मलिक, अनिल देशमुख यांनीही सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत ही दोन मतं महाविकास आघाडीला मिळाली असती तर सर्व त्यांचे उमेदवार निवडणून आले असते पण तसे झाले नाही. आता ही या बाबत काहीशी निराशाच दिसून येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेबद्दल विचारले असता, “आजच त्यांची शस्त्रक्रिया पुर्ण झाली असून आता त्यांची तब्येत ठीक आहे, कालच मी त्यांची भेट घेतली आम्ही खूप छान गप्पा मारल्या” असे ही राजू पाटील म्हणाले.
Exit mobile version