spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ट्विट डिलीट केल्याप्रकरणी, सुप्रिया सुळेंना मनसेने लगावला टोला

प्रसिद्ध विचारवंत आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief late Balasaheb Thackeray) यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांची आज जयंती आहे.

प्रसिद्ध विचारवंत आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief late Balasaheb Thackeray) यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त विविध पक्षातल्या नेत्यांनी जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर देखील त्यांना अभिवादन केले आहे. परंतु या सर्वामध्ये सध्या एक ट्विटची सर्वात जास्त चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्या ट्वीटची किंबहुना डिलीट केलेल्या ट्वीटची (Tweet) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तर या सर्व प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) देखील सुप्रिया सुळेंवर चांगलाच निशाण धरला आहे.

 सुप्रिया सुळे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचा उल्लेख प्रबोधनकार के सी ठाकरे असा केला होता. त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Maharashtra Navnirman Sena leader Sandeep Deshpande) यांनी सुळेंवर निशाणा साधला होता. प्रबोधनकारांना केसी ठाकरे म्हणण्याइतक्या तुम्ही मोठ्या झालेला नाहीत, असं म्हणत संदीप देशपांडेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.

 पुढे संदीप देशपांडेंनी आणखी एक ट्विट केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी जयंतीचं ट्विट डिलीट केल्याचं देशपांडे यांनी सांगितलं आहे. त्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करताना देशपांडे म्हणतात, “एस जी पवार साहेबांच्या सांगण्यावरुन ट्विट डिलीट केलंत का?”. दरम्यान, सकाळीच राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त एक ट्वीट केलं आहे. “आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. ते हिंदू संस्कृती, हिंदू धर्म याचे जाज्वल्य अभिमानी होते. त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना त्यांचं भाषण इथं शेअर करत आहे.”, असं ट्विट करत राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचं एक भाषणही शेअर केलं आहे.

हे ही वाचा:

मराठवाडा मुक्तिसंग्रामांचा इतिहास शाळेत शिकवा, राज ठाकरेंची मागणी

…म्हणून चित्त्यांसाठी करण्यात आली मध्यप्रदेशातील ‘ कुनो ‘ ठिकाणाची निवड

PM Narendra Modi Birthday 2022 : पंतप्रधानांच्या ७२ व्या वाढदिवसानिम्मित शुभेच्छांचा वर्षाव, वाचा कुणी कुणी दिल्या शुभेच्छा!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss