Raj Thackeray melava LIVE : कोरोना काळात ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

Raj Thackeray melava LIVE : कोरोना काळात ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

गोरेगावमधील नेस्को मैदानावर मनसे गट अध्यक्षांचा मेळावा सुरु आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता आहे पण त्याआधी मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत हाल्लाबोल केला आहे.

संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या एका गोष्ठीसाठी मी नतमस्तक होतो. कारण हे एकमेव मुख्यमंत्री आहेत की ते घरातून बाहेर न पडता देशातील मुख्यमंत्री झाले. चार संस्थांनी सर्व्हे केला. भारतात किती लोकांना विचारलं तुम्ही? दीडशे कोटी लोकांमध्ये २०० लोकांना विचारलं आणि त्यापैकी ८० लोकांनी म्हटलं आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नंबर वन वाटतात आणि म्हणून हे भारताचे नंबर वन मुख्यमंत्री झाले. पण घरात बसलेला माणून एक नंबरचा मुख्यमंत्री कसा? असा हल्लाबोल संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय.”

हेही वाचा : 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई गटध्यक्ष मेळावाच्या सभास्थळी रवाना

२५ वर्षे महापालिकेत सत्तेत आहेत. आधी बजेट २५ हजार कोटी होतं, आता ते ३६ हजार कोटी झालं. रस्त्यांना दरवर्षी सरासरी दोन हजार कोटी खर्च करतो. पाच वर्षांना १० हजार कोटी झाले. २५ वर्षांत ५० हजार कोटी झाले. ५० हजार कोटी रुपयांचे रस्ते दिसतायत का? ५० हजार कोटी गेले कुठे? असा सवालही त्यांनी केला. १६३२६ कोटी मिठी नदीसाठी खर्च केले. किती सफाई झाली त्याची? ही कपाटं गेली कुठे हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला असंही ते म्हणाले.

गट अध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे मार्गदर्शन (Raj Thackeray Nesco Sabha) करणार आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. सध्या अनेक विषयांवरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबात केलेलं वक्तव्य, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, सावरकरांबाबत राहुल गांधींनी केलेलं विधान याशिवाय इतर मुद्द्यांवर राज ठाकरे काय बोलतात याकडे मनसे कार्यकर्त्यांसह सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

लॉकडाऊनला विरोध करत, हुकूमशाही नको, लोकशाही हवी असा म्हणत, चीनमध्ये जिनपिंग यांच्या विरोधात लोक रस्त्यावर

Exit mobile version