spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरेंची ‘महाप्रबोधन यात्रा’, भाजपाची ‘जागर सभा’ यानंतर मनसे आता महाराष्ट्रात ‘भरारी’ घेणार, ‘घे भरारी’मधून महापालिका निवडणुकांची तयारी

आगामी काळातील मुंबई महानगरपालिका निवडणुकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) हे मुंबई (Mumbai) आणि कोकणात (Kokan) सभा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यानुसार ते मुंबईत एक तर, कोकणात दोन सभा घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आपले संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या २०१२ मधील मुंबई महापालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation) मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील सहा नगरसेवकांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीतही (Assembly Elections) मनसेला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर आता मनसेकडून आगामी मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Pune News महापुरुषांच्या अवमानकारक विधानाविरोधात पुणे बंद, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

दरम्यान, आता मनसे तयारीसह मैदानात उतरणार आहे. यासाठी मनसेकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘घे भरारी’ (Ghe Bharari) सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभांमध्ये पक्षाचे नेते, सरचिटणीस मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकीआधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी आणि त्यांच्यात उत्साह वाढवण्यासाठी या सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘घे भरारी’ संकल्पनेची लवकरच अधिकृत घोषणा होणार असून सभांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या सूत्रांनी दिली.

ठाकरे गटाकडून राज्यात महाप्रबोधन यात्रा (Mahaprabodhan Yatra) सुरू आहे, तर दुसरीकडे भाजपच्यावतीने (BJP) मुंबईत ‘जागर मुंबई’चा (Jagar Mumbaicha) अंतर्गत अनेक सभा सुरू आहेत. आता या दोन पक्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील महाराष्ट्रभर भरारी घेणार आहे. मनसेच्यावतीने ‘घे भरारी’ सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

गुंगा गुड्डा विजयी भवः …!

Latest Posts

Don't Miss