spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पनवेलमध्ये मनसेचा आज निर्धार मेळावा, काय बोलणार Raj Thackeray?

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. राज्यातील प्रत्येक पक्षामध्ये कोणती ना कोणती घडामोड ही घडतच आहे. अश्यातच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाकडून ऑफर असल्याच वक्तव्य केलं होतं.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी या घडत आहेत. राज्यातील प्रत्येक पक्षामध्ये कोणती ना कोणती घडामोड ही घडतच आहे. अश्यातच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाकडून ऑफर असल्याच वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात अनेक चर्चाना उधाण हे आले होते. तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पनवेलमध्ये तोफ धडाडणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.

सध्या सगळीकडे भारतीय जनता पार्टी आणि मनसे संदर्भात चर्चा या चालू आहेत. अश्यातच आज पनवेलमध्ये पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात मनसेचा निर्धार मेळावा होणार आहे. या निर्धार मेळाव्या मनसेकडून काय निर्धार केला जातो? त्याकडे राजकीय जाणकरांचे लक्ष आहे. तसेच भाजपकडील ऑफरवर राज ठाकरे आज काय बोलणार? मनसेची भूमिका काय असेल? याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुक्ता आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडले आहेत. प्रवासी या मार्गावरुन प्रवास करताना अक्षरक्ष: हतबल होतात. त्या विरोधात मनसेने हा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. स्वत: राज ठाकरे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करु शकतात. पनवेल शहरात या मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांविरोधात विभागावर आंदोलन करणार आहेत. पनवेल शहरात मनसेच्या या निर्धार मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून काढता पाय घेतला आणि शिंदे फडणवीस सरकारसोबत एकत्रित झाले. अजित पवार आणि राष्ट्रवादीचा इतर काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या महिन्याच्या २ तारखेला अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीचा इतर काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर राज्यात अनेक वेगवेगळ्या घडामोडी या घडतच होत्या. असं असतानाच २ ते ३ दिवसांपूर्वी पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाली. पुण्यात एका व्यावसायिकाच्या बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. त्यावर राज ठाकरे काय बोलणार? याकडेही लक्ष असेल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागच्या महिन्यात फूट पडली. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की, राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत सहभागी झाली. दुसरी टीमही लवकरच सत्तेत सहभागी होईल, असं म्हटलं होते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी घडतायत, त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल इंडियात आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे.

हे ही वाचा:

IND vs WI 4th T-20 – टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचे आव्हान

प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss