मुंबई, पुणे ठाण्यासह सर्वच ठिकाणी मनसेचा ‘एकला चलो चा नारा’

लवकरच मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये मनसेकडून 'एकला चलो रे 'चा नारा देण्यात आला आहे.

मुंबई, पुणे ठाण्यासह सर्वच ठिकाणी मनसेचा ‘एकला चलो चा नारा’

लवकरच मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये मनसेकडून ‘एकला चलो रे ‘चा नारा देण्यात आला आहे. अशी माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मनसेच्या या नाऱ्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

काही दिवसांपासून मनसे आणि शिंदे गटातील नेत्यांच्या तसेच भारतीय जनता पार्टीतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने युतीच्या चर्चेला उधाण आले होते. मुंबई महापालिकेसाठी मनसे आणि शिंदे गट युती करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत होती.

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळातल्या सर्व महानगरपालिका आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. राज ठाकरेंच्या आदेशानुसार सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे. या आधी देखील आम्ही स्वबळावर निवडणुका लढल्या होत्या. आम्ही मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभे करणार आहोत, असं संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं. आम्ही स्वतंत्र आहोत. सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झालाय. आम्ही सर्वच महापालिका निवडणुकीत आमची ताकद आजमावणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. युती हा जर तर चा विषय आहे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. तसेच, मनसेचा विदर्भ दौरा सुरू होत आहे. पक्ष वाढीसाठी हा दौरा करण्यात येणरा असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. यासोबतच, दसरा मेळाव्यावरुन सुरु असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नाही. बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडतायत. त्यामुळे कोणाचा मेळावा कुठे होतो ह्याला फार महत्त्व नाही. असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. तेव्हापासून महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिंदे गटाची युती होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच राज ठाकरे यांनी डबे जोडण्याचं काम सुरू झालंय असं विधान केलं होतं. त्यामुळे या तिन्ही पक्षांची युती होणार असल्याचं सांगितलं जात असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईसह कोणत्याही महापालिकेत मनसे कुणाशीही युती करणार नाही. आम्ही स्वबळावर लढू आणि सर्वच्या सर्व जागा लढू, असं संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी जाहीर करून युती आणि आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

हे ही वाचा:

Hindi Diwas 2022 : १४ सप्टेंबरला का साजरा केला जातो हिंदी दिवस?

अखेर शिंदेंच ठरलं, ‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर’ मुख्यमंत्र्यांचा निर्धार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version