spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोदी-अदानी भाई भाई, संसदेत पंतप्रधान मोदींच्या भाषणा दरम्यान विरोधकांची घोषणाबाजी

अनेक दिवसांपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील हिंडेनबर्ग (Hindenburg) या संस्थेने त्यांच्या अहवालात भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असणारे गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या समूहातावर फसवणुकीचे आरोप करण्यात आले होते. या अहवालानंतर गौतम अदानी यांच मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं. पण या विषयाचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत “नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उद्योगपती गौतमी अदाणी (Gautam Adani) यांच्यात संबंध आहेत. त्याच बरोबर गौतमी अदानी यांच्यात संबंध आहेत. गौतमी अदानी यांनी मागील २० वर्षांत भाजपाला अनेक रुपये दिले”, असे म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले आहेत. तसेच राहुल गांधी यांनी संसदेमध्ये उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांचे काही फोटो देखील सादर केले. पण या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर आजच्या संसदेमध्ये देखील विरोधकांनी अदानीचा मुद्दा उचलून धरला आहे.

काही दिवसांपासून संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अदानी समूहाच्या (Adani Grouop) घोटाळ्याशी संबंध असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. तसेच गौतम अदानी यांच्याविरोधात सरकारकडून कोणतीही कारवाई का केले जात नाही असा सवालही यावेळेस विरोधकांनी विचारला आहे. आतापर्यंत संसदेत (Parliament) बहुतांश वेळा गदारोळच पाहायला मिळाला. पण गौतम अदानींच्या मुद्द्यावर आज विरोधकांनी मोठ्याप्रमाणात गदारोळ केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितल की, “राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा सुरु आहे, त्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी आदरणीय राष्ट्रपतींचे आभार मानतो. मी त्यांचे अभिनंदन करतो. दोन्ही सभागृहांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी विकसित भारताचा रोडमॅप मांडला”. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला सांगितलं. पण अशातच भाषणादरम्यान विरोधी पक्षाकडून जोरदार गदारोळ करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी “मोदी-अदानी भाई भाईच्या” घोषणा दिल्या. या घोषणाबाजींनी विरोधकांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले.मात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भाषण सुरूच ठेवले.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत स्थित असलेल्या हिंडेनबर्ग संस्थेने एक अहवाल जाहीर केला होता या अहवालात अदानी समूहावर फसवणूक केल्याचे आरोप करण्यात आले. या नंतर संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या अहवालामुळे अदानी समूहाला खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. पण या मुद्द्याचा थेट पंतप्रधान मोदींशी संबंध असल्याचे विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत. तसेच सरकारकडून गौतम अदानींची चौकशी केली जावी अशी मागणी देखील विरोधक करत आहेत.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिम्मित प्रसाद ओक सह ‘या’ कलाकारांनी दिल्या शुभेच्छा!

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये लोकप्रतिनीधीही असुरक्षित, नाना पटोलेंचा हल्लबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss