spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून दिवाळी भेट रबी पिकांचा MSP वाढवण्यात आला,जाणून घ्या किती होणार फायदा?

केंद्र सरकारने येत्या रबी पिकांचे किमान हमी भाव म्हणजे एमएसपी जाहीर केले आहेत. गव्हाची एमएसपी २०१५ रुपयांवरुन २१२५ क्विंटल म्हणजे ११० रुपयांनी वाढवली आहे. तर हरभऱ्याचा एमएसपी १६३५ वरुन १७३५ म्हणजे १०५ रुपयांनी वाढवण्यास केंद्रिय कॅबिनेटने मान्यता दिली आहे. केंद्राच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारने२०२३-२४ च्या रब्बी हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत एमएसपी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं. त्यानुसार मसूरच्या किमतीत दर क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर गव्हाच्या किमतीत ११० रुपायांची वाढ करण्यात आली आहे. चना किमतीत १०५ रुपयांची तर मोहरीच्या किमतीत ४०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या पिकांच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे.

आलिया भट ‘या’ हॉस्पिटलमध्ये देणार तिच्या बाळाला जन्म, जाणूनघ्या पूर्ण माहिती

२०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात उत्पादन खर्चाच्या १.५ पट एमएसपी देण्याच्या घोषणेच्या अनुषंगाने रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केल्याचा सरकारचा दावा आहे. तसेच, रेपसीड आणि मोहरीवर १०४ टक्के परतावा मिळेल असा सरकारचा दावा आहे. गव्हावर १०० टक्के, मसूरवर ८५ टक्के, चण्यावर ६६ टक्के, सैफ फ्लॉवरवर ५० टक्के आणि बार्लीवर ६० टक्के परतावा मिळत आहे.

Ultraviolette F77 Electric Bike : अल्ट्राव्हायोलेट F77 न्यू इलेक्ट्रिक बाईक, या महिन्यात होणार लॉन्च

किती पिकांसाठी एमएसपी जाहीर केला जातो?
CACP कडून सध्या २३ पिकांसाठी एमएसपी जाहीर केला जातो. त्यामध्ये ७ अन्नधान्य पिके, ५ डाळी,७ तेल बिया आणि ४ व्यावसायिक पिकांसाठी सध्या एमएसपी जाहीर केला जातोय.

Latest Posts

Don't Miss