मोदींनी दिल्यात, ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या हातात तिजोरीच्या चाव्या , उद्धव ठाकरे

ठाकरे गटाकडून “आवाज कुणाचा” पॉडकास्ट सुरू करण्यात येणार होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेलवर सुरू करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे.

मोदींनी दिल्यात, ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या हातात तिजोरीच्या चाव्या , उद्धव ठाकरे

ठाकरे गटाकडून “आवाज कुणाचा” पॉडकास्ट सुरू करण्यात येणार होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेलवर सुरू करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे. जनतेच्या मनातले प्रश्न त्यासोबतच महाराष्ट्राचे भविष्याचा विचार त्यासोबतच स्पष्ट आणि खणखणीत माहिती या “आवाज कुणाचा” शिवसेना ठाकरे गटाच्या पॉडकास्टमधून ऐकायला मिळणार आहे असे सांगितले जात आहे. तसेच आगामी निवडणुकांचा विचार करता शिवसेना ठाकरे गटाची भूमिका लोकांचे प्रश्न आणि त्याची उत्तरे कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम हे सगळं या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे. तसेच ठाकरे गटाच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या आवाज कुणाचा या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. संजय राऊतहे स्वतः उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.

आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा या शीर्षकाखाली घेण्यात आलेली ही मुलाखत दोन भागांमध्ये प्रसारित होणार असल्याचे ठरलेले आहे त्याप्रमाणे आज म्हणजे बुधवारी सकाळी आठ वाजता अनुक्रमे पहिला आणि गुरुवारी सकाळी आठ वाजता दुसरा भाग प्रसारित करण्यात येणार होता आणि सांगितल्याप्रमाणे आज म्हणजे बुधवारी सकाळी आठ वाजता पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवनानिमित्त संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे देताना भाजपाच्या कुटनीतीवर टीका केली. तसंच, शिवसेनेने पाठित खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली असे म्हणणारे राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं म्हणून राष्ट्रवादी फोडली”, असा सणसणीत सवालही ठाकरेंनी या मुलाखतीत उपस्थित केला. तसेच एक गंमत सांगायची झाली तर ज्यांच्यावर पंतप्रधानांनी ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. मग आरोप खरे की अजित पवार खरे?, असा प्रश्नही ठाकरेंनी विचारला.

शिवसेनेने खंजीर खुपसला मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होत? शिवसेना फोडून ४० आमदार आल्यानंतर, संख्याबळ असतानाही राष्ट्रवादी का फोडलीत? ते फोडण्याआधी चार ते पाच दिवस आधी पंतप्रधानांनीच आरोप केले होते. त्या आरोपांचे आता काय झाले, त्या घाटोळ्याच्या पैशांचं काय झालं, कशासाठी ही फोडाफोडी केलीत, म्हणूनच म्हटलं एवढा भ्रष्टाचारी राष्ट्रवादी पक्ष आहे किंवा होता तर त्यांनी नेमकी तुमच्याशी काय गद्दारी केली होती की त्यांना तुम्ही फोडलंत”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. पण त्यावर भाजपचं असं म्हणणं आहे की, राष्ट्रवादीशी जी त्यांनी युती केली म्हणा किंवा पक्ष फोडला म्हणा, ती आमची कूटनीती आहे, अधर्म नाही”, असं संजय राऊत म्हणाले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “ही कूटनीती आहे की आधीपासूनची मेतकूट नीती आहे हे माहीत नाही मला, पण या कूटनीतीला आता कुटून टाकण्याची वेळ आली आहे. त्यांना माणसं दिसेनाशी झाली आहेत. महिलांवरील अत्याचार दिसेनासे झाले आहेत. वाढती महागाई वगैरे तर बोलूच नका. हे विषय तर त्यांच्या लेखी काहीच नाहीयत आणि एका खोट्या भ्रमात सत्ता चालवत आहेत, असे सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीसांनी लिहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

ही बैठक गोवा-सिंधुदुर्ग घेण्यात यावी, अनिल परब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version