spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जगातील दोन शक्तिशाली नेत्यांची द्विपक्षीय बैठक, पुतिन यांच्याशी भेटीदरम्यान मोदींनी मांडली भूमिका

आजचा काळ युद्धाचा नाही, येणाऱ्या काळात शांततेच्या मार्गावर आपल्याला पुढे जावं लागेल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उझबेकिस्तानातील समरकंद इथं सुरु असलेल्या एसओएस समिटमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान मोदींनी आपली भूमिका मांडली.

यावेळी मोदी म्हणाले, “मला रशिया आणि युक्रेनचे आभार मानायचे आहेत. कारण युद्धाच्या संकटकाळात सुरुवातीला आमचे हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. तुम्हा दोन्ही देशांमुळं त्यांना सुखरुप भारतात आणण्यात आलं. मला जाणीव आहे की आजचा काळ हा युद्धाचा नाही. यापूर्वीही फोनवरुन मी तुमच्यासोबत अनेकदा लोकशाही, रणनीती तसेच संवाद यावर चर्चा केली आहे. या सर्व गोष्टी जगाला स्पर्शून जातात. त्यामुळं येणाऱ्या काळात शांततेच्या मार्गावरुन आपण कसे पुढे जाऊ यावर आपण चर्चा करायला हवी. याबाबतचा आपला दृष्टीकोन जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे”.

त्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी मोदींना वाढदिवसांच्या शुभेच्या दिल्या नाहीत. उझबेकिस्तानमधील समरकंद येथे SCO शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी पुतिन म्हणाले की, ‘माझ्या प्रिय मित्रा, तू नुकताच तुझा वाढदिवस साजरा करणार आहेस, पण मी तुला शुभेच्छा देऊ शकत नाही आणि शुभेच्छा देऊ शकत नाही.

रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले की, रशियामध्ये वाढदिवसापूर्वी आगाऊ शुभेच्छा दिल्या जात नाहीत. त्यामुळे या क्षणी मी तुमचे अभिनंदन करत नाही, परंतु माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत आणि सदैव असतील.

PM Narendra Modi Birthday 2022 : मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार ‘हि’ खास गोष्ट

Latest Posts

Don't Miss