spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पीएम विश्वकर्मा कार्यक्रमातुन मोदींनी काँग्रेसवर साधला निशाणा, काँग्रेसने ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे आले असून पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते उपस्थित आहेत.

PM Narendra Modi Live In Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे आले असून पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केला आहे. यावेळी बोलत असताना नरेंद्र मोदी यांनी मराठी मधून भाषणाला सुरवात केली आहे. तसेच पुढे बोलता बोलता नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षांवर जोरदार निशाणा हा साधला आहे.

“विश्वकर्मा समाजाकडे मागच्या सरकारने पाहिलं असतं तर मोठी प्रगती झाली असती. पण काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी एससी, एसटी ओबीसींना पुढे जाऊ दिलं नाही. आम्ही काँग्रेसच्या दलितविरोधी विचाराला मूठमाती दिली आहे” असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. “गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक लाभ एससी, एसटी आणि ओबीसी समाज घेत आहे” असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

 

यावेळी ते म्हणाले आहेत की दोन दिवसांपूर्वीच आपण सर्वानी विश्वकर्म पूजेचा उत्सव हा साजरा केला आहे. महाराष्ट्रातील ६० हजार कारागिरांना प्रशिक्षण देण्यात आला आहे. तसेच देशभरातील कारागिरांना देखील प्रशिक्षण देण्यात आला आहे . आम्ही विश्वकर्मा साथीदारांना एम एस एम इ चा अर्ज दिला आहे. या विश्वकर्मा योजनेअंतर्गत १४०० कोटींचा कर्ज वाटप करण्यात आला आहे. विश्वकर्मा योजनेतून कारागिरांना कर्ज देखील देण्यात येतंय. विश्वकर्मा कारागिरांचा जीवनमान उंचावणं हेच आमचे ध्येय आहे. आमच्या सरकारकडून विश्वकर्मा कारागीरांकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच साडेसहा कारागिरांना अत्याधुनिक उपकरणांचे वाटप करण्यात आले आहे. आपल्या पारंपरिक कौशल्याला जगभरात ओळख देण्याचा प्रयत्न करीत आहोत असे या वेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा देखील दिले आहेत.

हे ही वाचा:

 
 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss