spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

यंदाचं मोदींचे भाषण तब्बल १ तास २२ मिनीट ३२ सेकंदांचं

यावेळी मोदींनी १ तास २२ मिनिटं ३२ सेकांदांच भाषण करत स्वतःचाच रेकॉर्ड मोडला.

आज १५ ऑगस्ट २०२२ भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली. यंदा देशात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. देशात सगळीचकडे उत्साहाच वातावरण दिसून येत आहे. सकाळी ७.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. ध्वजारोहणानंतर मोदींनी आपल्या भाषणातून जनतेला संबोधित केले आणि लाल किल्ल्यावर तब्बल दीड तास सलग भाषण करत मोदींनी सर्वाधिक भाषण करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. यावेळी मोदींनी १ तास २२ मिनिटं ३२ सेकांदांच भाषण करत स्वतःचाच रेकॉर्ड मोडला.

१५ ऑगस्टला दरवर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून लोकांना संबोधित करतात. १९४७ साली देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भाषण ७२ मिनिटे चालले होते. त्यानंतर २०१६ साली नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण सर्वाधिक लांबीचे भाषण ठरले होते. मोदींनी आज केलेल्या भाषणात त्यांनी भ्रष्टाचार, महिला, शिक्षण, कृषी, तंत्रज्ञान, विकसित भारत, नागरिकांची कर्तव्ये, डिजिटल भारत अशा विविध आणि महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांचे विचार व्यक्त केले.

बलिदान देणाऱ्यां प्रति नतमस्तक होण्याची संधी : पंतप्रधान मोदी

देशातील असा कोणताही कोपरा नव्हता किंवा असा भाग नव्हता जिथे भारतातील गुलामगिरीविरुद्ध बंद पुकारण्यात आला नव्हता. भारताला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी लधाडीला, आपल्या प्राणांची आहुती दिली आणि भारताला स्वतंत्र होण्यास मदत केली. आज सर्व देशवासियांना अशा प्रत्येक महापुरुषाला, प्रत्येक बलिदानाला आणि त्याग करणाऱ्या प्रति नतमस्तक होण्याची संधी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

‘मेड इन इंडिया’ मोहिमेला चालना

देशाच्या ७५ व्य स्वतंत्रदिनानिम्मित देशाला २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “देशाला आत्मनिर्भर बनायची गरज आहे”. सध्या मेक इन इंडिया या संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आत्मनिर्भर भारत योजनेचा उद्देश जगाला भारताची ताकद दाखवणं आहे. जागतिक बाजारात स्वदेशीला स्थान मिळवून देणं आपलं ध्येय असेल.’, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षात पंतप्रधानांची भाषण किती वेळ चालली?

2002 – 25 मिनिटं – अटलबिहारी वाजपेयी
2003 – 30 मिनिटं – अटलबिहारी वाजपेयी
2004 – 45 मिनिटं – मनमोहन सिंह
2005 – 50 मिनिटं – मनमोहन सिंह
2006 – 50 मिनिटं – मनमोहन सिंह
2007 – 40 मिनिटं – मनमोहन सिंह
2008 – 45 मिनिटं – मनमोहन सिंह
2009 – 45 मिनिटं – मनमोहन सिंह
2010 – 35 मिनिटं – मनमोहन सिंह
2011 – 40 मिनिटं – मनमोहन सिंह
2012 – 32 मिनिटं – मनमोहन सिंह
2013 – 35 मिनिटं – मनमोहन सिंह
2014 – 65 मिनिटं – नरेंद्र मोदी
2015 – 88 मिनिटं – नरेंद्र मोदी
2016 – 94 मिनिटं – नरेंद्र मोदी
2017 – 56 मिनिटं – नरेंद्र मोदी
2018 – 83 मिनिटं – नरेंद्र मोदी
2019 – 92 मिनिटं – नरेंद्र मोदी
2020 – 90 मिनिटं – नरेंद्र मोदी
2021 – 88 मिनिटं – नरेंद्र मोदी
2022 – 82 मिनिटं – नरेंद्र मोदी

हे ही वाचा:

येणारी २५ वर्षे मोठ्या संकल्पाची – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Latest Posts

Don't Miss