मोहित कंबोज यांच्या सूचक ट्वीटवर, राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर

मोहित कंबोज यांच्या सूचक ट्वीटवर, राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर

अनेकदा आपल्या विधानावरून चर्चेत असलेले भाजप नेते मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटर वरून एक सूचक ट्वीट करत राष्ट्रवादीला डिवचला आहे. त्यांनी ट्वीट मधून म्हटले, ” लवकरच राष्ट्रवादीचा नेता देशमुख आणि मलिकंना भेटणार” असे त्यांनी आपल्या ट्वीट मधून म्हटले आहे. त्यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आता या प्रकणावरू राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. कंबोज यांच्या ट्वीट नंतर राष्ट्रवीदीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत मोहित कंबोज कधीपासून एवढे मोठे नेते झाले अशी टीका केली आहे. मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता नेमका कोण ? तसंच कोणत्या नेत्याचा ते पर्दाफाश करणार आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा : 

मुख्यमंत्र्यांच्या टीकेमुळे पावसाळी अधिवेशनाआधी तापणार महाराष्ट्रातील राजकारण

Exit mobile version