spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोहित कंबोस यांच्या ट्विटमुळे पुन्हा खळबळ, राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल?

सध्या राज्यच्या राजकारणात भाजपचे नेते मोहित कंबोज हे चर्चेचा विषय ठरत आहेत. कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर लक्षकेंद्रित करत आहेत. मोहित कंबोज यांची ट्विटची मालिका चालूच आहे. त्यात आणखी भर म्हणून कंबोज यांनी पुन्हा राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचं ट्विट केलं आहे. त्यानंतर, रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यानंतर, कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. कंबोज आणि विद्या चव्हाण यांच्यात ट्विटवर आरोप आणि प्रत्यारोपाचा खेळ चालू झाल्याचे पाह्यला मिळत आहे.

हेही वाचा : 

मायकल जॅक्सनने मागे सोडली इतकी संपत्ती, मृत्यूनंतरही कमावले करोडो


ट्विट पे ट्विट : 

‘विद्या ताई जय श्री राम’, असं ट्विट कंबोज यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण यांनी कंबोज यांच्याबोबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूक काळात पैसे वाटपाच्या आरोपावेळी फडणवीसांच्या एका फोनमुळे मोहित कंबोजची सुटका झाली होती असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.

परळ पेट्रोल पॅम्प शेजारी पाईप गळतीमुळे आग ; अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल

विद्या चव्हाण यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती, त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध मुंबईतील सांताक्रूझ पीएस येथे आयपीसी कलम ५००, ५०५(२), १३५ आणि ३७(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि तक्रार मोहित कंबोज यांनी दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

शरद पवार यांचे मिशन ‘ठाणे’

Latest Posts

Don't Miss