Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Mansoon Session 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ८ आमदारांचे राजीनामे, सभागृहात वाचून दाखवण्यात आली नावे…

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Vidhan Sabha session) आज पासून मुंबई येथे सुरु झाले आहे.

Maharashtra Assembly Mansoon Session 2024 : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Vidhan Sabha session) आज पासून मुंबई येथे सुरु झाले आहे. १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे. गुरुवार, २७ जून म्हणजेच आजपासून सुरु झाले आहे. महायुती सरकारचे हे अधिवेशन सध्या चर्चेचा विषय झाले आहे. सदर पावसाळी अधिवेशन शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर जमा होऊन जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यावर प्रचंड गोंधळ घातला. टक्केवारी सरकार, चोर सरकार अशा घोषणा देत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होत आहे. तर २८ जूनला अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी ज्या आमदारांनी राजीनामा दिला, अशा आमदारांची नावं सभागृहात वाचून दाखवली.

राजीनामा दिलेल्या सदस्यांची माहिती

राजू पारवे – उमरेड विधानसभा (राजीनामा – २४ मार्च)
निलेश लंके – पारनेर विधानसभा (राजीनामा – १० एप्रिल)
प्रणिती शिंदे – सोलापूर शहर मध्य विधानसभा
बळवंत वानखेडे – दर्यापूर विधानसभा
प्रतिभा धानोरकर – वरोरा विधानसभा (१३ जून)
संदीपान भुमरे – पैठण विधानसभा (१४ जून)
रविंद्र वायकर – जोगेश्वरी पूर्व विधानसभा
वर्षा गायकवाड – धारावी विधानसभा

राजू पारवे वगळता ज्या आमदारांनी राजीनामा दिला आहे, ते सर्व आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे ते संसदेत गेले आहेत. त्यामुळे त्यांना विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. यामध्ये निलेश लंके, प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांच्यासह ८ आमदारांचा समावेश आहे. राजू पारवे यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, लोकसभा निवडणूक लढवली होती. रामटेक मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांचा पराभव केला.

हे ही वाचा

Thane शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी CM Shinde यांचे कारवाईचे निर्देश

Litchi Fruit Benefits: लिची तुम्हाला आवडते का? फायदे वाचून व्हाल थक्क…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss