spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काळ विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा चहा पानाचा कार्यक्रम देखील पार पडला.

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काळ विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचा चहा पानाचा कार्यक्रम देखील पार पडला. महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची (Maharashtra Monsoon Session 2023) तारीख ठरली आहे. यंदाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) १७ जुलैपासून सुरु होणार असून ते १४ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हे अधिवेशन मुंबईत (Mumbai News) पार पडणार असून १५ दिवस सुरू राहणार आहे. दरम्यान, १७जुलै पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) देखील उपस्थित होते.

त्यामुळे आजपासून विधी मदंडळात आरोप प्रत्यारोप केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे विरोधक आणि सत्ताधर्यांमध्ये रणधुमाळी होणार असल्याचे स्पष्ट चिरा दिसत आहे. कारण सध्याच्या राजकारणात एकमेकांवर असे देखील ताशेरे ओढले जातात. परंतु आता पावसाळी अधिवेशनाच्या दिवसांपासून पुढचे १५ दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय हेवेदावे बघायला मिळणार आहे. त्याच बरोबर या पावसाळी अधिवेशनात काही महत्वाचे मुद्दे देखील मांडले जातात. तसेच जनतेच्या हिताच्या दृष्टीने कोणती गोष्टी महत्वाच्या आहेत त्यावर देखील मुद्दे मांडून सत्ताधारी आणि विरोपधकानामध्ये वादंग निर्माण होताना बघायला मिळत आहे.

त्याचबरोबर सद्य स्थितीला टोमॅटोचे वाढलेले भाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोविड घोटाळा, रस्ते घोटाळा, महिलांवरचे अत्याचार, अजित पवारांचं बंड, महायुतीतली धुसपूस, महाविकास आघाडीतली पडलेली फूट, अशा एक ना अनेक मुद्द्यांवरुन यंदाचं पावसाळी अधिवेशन गाजणार आहे. आणि हे गाजलेले विधान परिषद पाहताना नवीन कोणते मुद्दे बाहेर येतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार अजून देखील झालेला दिसत नाही त्यामुळे हा देखील मुद्दा विरोधकांकडून जोरावर घेतला जाऊ शकतो अशी चिन्ह दिसत आहे.

हे ही वाचा:

जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु, नाना पटोले

International Justice Day म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss