spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यात उद्यापासून पावसाळी अधिवेशन तर, आज मंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका

महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Maharashtra State Legislature) उद्यापासून 17 म्हणजेच ऑगस्ट 2022 रोजी सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या नेत्यांच्या आज महत्त्वपूर्ण बैठका पार पडतील. या पावसाळी अधिवेशनासाठी विरोधकांनी देखील तयारी सुरू केली आहे. खाते वाटपानंतरची ही पहिलीच बैठक असणार आहे. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्याचप्रमाणे विरोधीपक्ष नेत्यांची देखील पत्रकार परिषद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला 17 ऑगस्ट पासून सुरुवात होणार असून या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी विरोधी पक्षाचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथिगृहावर चायपानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व त्याठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील होणार आहे.

रवींद्रनाथ टागोरांनी स्वतः गायले होते ‘जन गण मन’…

राज्याचे हे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट पर्यंत असणार आहे यामध्ये तीन सुट्ट्या जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज हे सहा दिवसांचे असणार आहे 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशन सुरू होणार असून, यामध्ये शुक्रवारी 19 ऑगस्ट रोजी दहीहंडीची सुट्टी असणार आहे दिनांक 20 आणि 21 ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी आहेत या दिवशी कामकाज होणार नाही 24 ऑगस्ट रोजी विधिमंडळाच्या कामकाजात स्वतंत्र अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

हेही वाचा : 

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण

Latest Posts

Don't Miss