१०० हून अधिक खासदारांचा ऋषी सुनक यांना पाठिंबा ; पंतप्रधानपद जवळपास निश्चित

१०० हून अधिक खासदारांचा ऋषी सुनक यांना पाठिंबा ; पंतप्रधानपद जवळपास निश्चित

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे आता लिझ ट्रस यांची पंतप्रधानपदी जाण्यासाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत कारण त्यांना १०० हून अधिक टोरी खासदारांचा सार्वजनिक पाठिंबा मिळाला आहे तर माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की ते शर्यत सोडत आहेत. बोरिस जॉन्सन यांनी ठामपणे सांगितले की त्यांना १०२ खासदारांचा पाठिंबा आहे परंतु त्यांच्यासाठी “ही योग्य वेळ नाही” असे त्यांनी म्हटले आहे. यासह, टोरी पक्षाच्या नेतृत्वाची लढत ऋषी सुनक आणि पेनी मॉर्डंट यांच्यात आहे. जिंकण्यासाठी अत्यंत अनुकूल, ऋषी सुनक यांना १४७ खासदारांचा सार्वजनिक पाठिंबा आहे – पात्र होण्यासाठी आवश्यक असलेल्या १०० नामांकनांच्या पुढे.

ऋषी सुनक यांनी काल पंतप्रधान पदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटनमध्ये पंतप्रधान पदासाठी निवडणूक होतेय. आता तर बोरिस जॉन्सन यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सुनक यांचं पंतप्रधानपद जवळपास निश्चित समजलं जात आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतली आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचं पंतप्रधानपद जवळपास निश्चित मानलं जातंय. जॉन्सन यांनी रविवारी रात्री आपला निर्णय जाहीर केला. ”ही योग्य वेळ नाही” असं जॉन्सन म्हणालेत. कालच ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. ब्रिटनची अर्थव्यवस्था आम्हाला बळकट करायची आहे. पक्षाला एकजूट करुन देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यासाठीच पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवत आहे, असं सुनक म्हणाले होते. जॉन्सन यांच्या माघारीमुळे सुनक यांचं पंतप्रधानपद निश्चित मानलं जातंय.

ब्रिटनच्या पंतप्रधान (Prime Minister of Britain) लिझ ट्रस (Liz Truss) यांनी ४५ दिवसांच्या कार्यकाळानंतर गुरुवारी अचानक राजीनामा दिला. लिझ ट्रस राजीनामा देणार असल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून लावला जात होता. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांची पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी स्पर्धा सुरु होती. आता लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा :

CIDCO Lottery : दिवाळीनिमित्त सिडकोचे सामान्यांना गिफ्ट; आता नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण

कुरुक्षेत्र असो की लंका – युद्ध हा शेवटचा पर्याय; पंतप्रधान मोदी कारगिलमध्ये दिवाळीनिमित्त सैनिकांना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version