…तीन लाखाहून अधिक लोक जमतील – दीपक केसरकर

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट यांच्या सत्तासंघर्षाचे वातावरण हे निर्माण झाले आहे. त्यातच आता दसरा मेळाव्यासाठी आता शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अखेर शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच पक्षाचे दोन दसरा मेळावे होणार आहेत.

…तीन लाखाहून अधिक लोक जमतील – दीपक केसरकर

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट यांच्या सत्तासंघर्षाचे वातावरण हे निर्माण झाले आहे. त्यातच आता दसरा मेळाव्यासाठी आता शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अखेर शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच पक्षाचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्ध्दव ठाकरे यांचा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे दादरच्या शिवाजी पार्कवर होणार आहे. तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली त्यांचा मेळावा बीकेसीतल्या मैदानावर होणार आहे. या मेळाव्याला तीन लाखाहून जास्त लोक येतील, असा विश्वास शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

दसरा मेळाव्याच्या यशाबद्दल बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. हायकोर्टाच्या निर्देशांचं पालन करण्यासाठी पोलीस तत्पर असतील. बीकेसीतल्या मेळाव्याला तीन लाखांपेक्षा जास्त लोक येतील. बाळासाहेबांचा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडतील. असंख्य नागरिक शिंदेंच्या स्वागतासाठी असतील. दसरा मेळाव्याच्या आयोजनाबद्दल बोलताना केसरकर म्हणाले, “दसरा मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी पोलीस घेतील. सर्वांनी लवकर सभास्थानी पोहोचणं गरजेचं आहे. पार्किंगला गाड्या लावून ५-१० मिनिटं चालत सभास्थानी पोहोचता येईल. बीकेसीतला मेळावा अतिभव्य होणार आहे. राज्यातली जनता आशेने मुख्यमंत्री शिंदेकडे पाहतेय.” असे वक्तव्य दिपक केसरकर यांनी केले आहे. तसेच दसऱ्या मेळाव्यासंदर्भात उदय सामंत यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केले आहे.

आमचा मेळावा हा ऐतिहासिक आहे. यंदाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या ऐतिहासिक मेळाव्याला ऐतिहासिक गर्दी होईल, असं सामंत म्हणाले आहेत. याशिवाय शिंदे गटातील प्रवेशावरही त्यांनी भाष्य केलंय. बरेच लोक शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक आहेत. उद्याही काही आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. तसं चित्र उद्याच्या मेळाव्यात पाहायला मिळू शकतं., असं उदय सामंत म्हणालेत. आज आणि उद्या मुंबईत बॅनरवॉर पाहायला मिळणार आहे. लाखो कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची रेलचेल पाहायला मिळेल. हे सगळं होत असताना मी ठामपणे एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं उधळणार… !, असं सामंत म्हणालेत. उद्याच्या भाषणावरही त्यांनी आपलं मत मांडलं आहे. आमचावर खालच्या पातळीची टिका झाली. उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या मेळाव्यातही अशीच टिका होऊ शकते, असं वाटतंय. पण सगळ्यांनीच पातळी सांभाळून बोललं पाहिजे. ठाकरेंनी तसंच बोलावं, असं सामंत म्हणालेत.

शरद पवारांनी जो सल्ला दिलाय तो योग्य आहे . शिवसेनेनं तो लक्षात घ्यावा. आमच्यावषयी बोलताना, टिका करताना तारतम्य बाळगावं, असंही सामंत म्हणालेत. उद्धव ठाकरे आम्हाला गद्दार बोलतात. शिवराळ भाषा वापरतात. काहीही बोलतात. पण आम्ही एका शब्दाने त्यांना बोलत नाही, असंही सामंत म्हणालेत. उद्या शिवसेनेचा शिवाजीपार्कवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर मेळावा होतोय. यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

हे ही वाचा:

विभागप्रमुखांनी प्रश्न विचारुन युवासेनेच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केला राग

Dasara Melava : अमृता फडणवीसांचे मोठं वक्तव्य म्हणाल्या, एकनाथ शिंदे माझे फेवरेट आहेत…

Navratri 2022 : लालबागची माता नवरात्रोत्सवनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version