Hemant Godse एक मच्छर आदमी को… राऊतांच्या टीकेला हेमंत गोडसेंनी दिलं प्रत्युत्तर

Hemant Godse एक मच्छर आदमी को… राऊतांच्या टीकेला हेमंत गोडसेंनी दिलं प्रत्युत्तर

खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या यशवंत सिनेमातील डायलॉगच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है, असं म्हणत गोडसे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय.

दरम्यान काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) आलेल्या संजय राऊत यांनी गोडसे यांच्यासह प्रवेश केलेल्या इतरांचा चागंलाच समाचार घेतला होता. त्यानंतर हेमंत गोडसे यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, कुणी काहीही टीका करू देत, आम्ही आमच काम करतोय. इतरांना टिकेला उत्तर देण्यापेक्षा आम्ही कामावर लक्ष देतो. त्यामुळे आम्ही कमी बोलतो आणि जास्त काम करतो. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मच्छरची उपमा दिली, तर त्यांना सांगतो की नाना पाटेकरच्या यशवंत पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, की एक मच्छर आदमी को…बना देता है, आम्ही तर छत्रपतींचे मावळे आणि शिवसेनाप्रमुखांचे विचारांचे वारसदार आहोत, त्यामुळे काय करू शकतो हे वेगळं सांगायची गरज नाही असे गोडसे म्हणाले.

हेही वाचा : 

Maharashtra Winter Session 2022 ‘बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट कुणी केलं हे कळलंय’, विधानसभेत शिंदेनी केला खळबळजनक दावा

पुढे गोडसे म्हणाले, जनतेला माहित आहे की, खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम कोण करत आहे. एकनाथ शिंदेसाहेबांनी जे पाऊल उचललं. त्यासोबत ४० आमदार, १२ खासदार आणि नाशिक महापालिकेतील १२ माजी नगरसेवक सहभागी झाले आहेत. आमचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. मागच्या काही दिवसापासून शिंदेगटात येणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे येत्या काळात आमच्या सेनेत येणाऱ्यांची संख्या वाढतच जाईल, असंही गोडसे म्हणालेत.

काही दिवसंपूर्वी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर होत. यावेळी त्यांनी खासदार गोडसे यांना मच्छराची उपमा देत त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर नाशिकमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशा वेळी खासदार हेमंत गोडसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे गोडसे म्हणाले. मच्छर चावला तर डेंग्यू होतो, प्लेटलेट कमी होतात, असे म्हणत नाना पाटेकर यांच्या चित्रपटातील ‘एक मच्छर भी आदमी को हिजडा बना देता है’ हा संवाद म्हणत त्यांनी विरोधी गटावर आणि खासदार राऊतांवर टीका केली.

Maharashtra Winter Session 2022 मिंधे सरकारविरोधात ‘मविआ’चे आमदार आक्रमक, पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

Exit mobile version