spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खा. जाधव आधी म्हणाले वाझे मातोश्रीवर १०० कोटी पाठवायचे, आता वक्तव्यावरुन युटर्न

शिवसेने आणि शिंदे गटा मध्ये रोज जोरदार शाब्दिक वाद पहिला मिळतो. भाजपाकडून ५० कोटी रुपये घेऊन सेनेतील आमदार शिंदे गटात गेल्याचा आरोप शिवसनेकडून करण्यात आला होता. पण आता यावर शिंदे गटातील बुलढाणा (Buldana News) लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी रुपये जायचे असा गंभीर आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केला होता. पण आज त्या वक्तव्यावरुन त्यांनी घुमजाव केलंय. मातोश्रीवर १०० खोके जायचे असं मला म्हणायचं नव्हतं, असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन युटर्न घेतला आहे.

मविआ सरकारच्या काळात पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबईतील रेस्टॉरंट आणि बारमधून कलेक्शन गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप झाला. यामध्ये तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांचंही नाव गोवलं गेलं. पैशांच्या अफरातफरीप्रकरणी ते देखील सध्या तुरुंगात आहे. याच प्रकरणावरुन विरोधी पक्ष सातत्याने टीका करत असताना खासदार प्रतापराव जाधव यांनीही काल याप्रकरणावरुन थेट मातोश्रीवर गंभीर आरोप केले.

महाविकास आघाडीच्या काळातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना १०० कोटी रुपयांचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पत्राद्वारे केला होता. त्यावरून अनिल देशमुख आणि सचिन वाझे सध्या पोलीस तुरुंगात आहेत. त्यावरूनच सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी दर महिन्याला पाठवायचे असा आरोप प्रतापराव जाधव यांनी केला होता. गंभीर आरोप केल्यानंतर आज प्रतापराव जाधव यांनी युटर्न घेतला. “मी काल केलेल्या आरोपावेळी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलेलं नव्हतं. माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात सचिन वाझे याचं समर्थन केलं होतं. सचिन वाझे काय दाऊद आहे का? असं त्यांनी म्हटलं होतं. तसेच तत्कालिन गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामाही घेतला नव्हता. मला म्हणायचं असं होतं की- मविआवर त्या घोटाळ्याचे आरोप होते, मी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलेलं नव्हतं”, अशी सारवासारव खासदार जाधव यांनी केली.

हे ही वाचा:

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतले श्री सप्तश्रृंगी मातेचे दर्शन

भाजप नकोच अशी भूमिका घेत मैत्रीपूर्ण निवडणूक व्हावी- अब्दुल सत्तार

Follow Us

Latest Posts

Don't Miss