Wednesday, September 25, 2024

Latest Posts

खा. प्रतापराव जाधव यांची संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी…

बुलढाण्याचे खासदार व शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख प्रतापराव जाधव झाले शिंदे गटात सामील.

महाराष्ट्रात शिवसेनेतील आमदारांनी आणि खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत चांगलीच फूट पडली आहे आणि याचमुळे पक्षातील बंडखोर खासदारांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हाप्रमुख शांताराम दाणे पाटील, उपजिल्हाप्रमुख राजू मिरगे, संजय अवताडे, नांदुरा तालुका प्रमुख संतोष डिवरे, मलकापूर तालुका प्रमुख विजय साठे, शेगाव तालुका प्रमुख रामा थारकार यांचीसुद्धा  शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.  बुलढाण्यातील दोन आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या पाठोपाट खासदार प्रतापराव जाधव देखील शिंदे गटात सामील झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव यांच्या जागी बुलढाणा जिल्ह्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी वसंतराव भोजने यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

 

 

Latest Posts

Don't Miss