Wednesday, September 25, 2024

Latest Posts

शिंदे गटात सामील होऊन पहिल्यांदाच बुलडाण्यात आल्यावर खासदार प्रतापराव जाधवांचे स्पष्टीकरण

खासदार प्रतापराव जाधव हे पहिल्यांदाच बुलढाण्यात आले.

बुलढाणा – शिवसेनेतील अनेक आमदार, पदाधिकऱ्यांनंतर आता खासदारांनी ही शिंदे गटात सामील झाले. सामील झालेल्या खासदारांपैकी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे देखील नाव आहे. खासदार प्रतापराव जाधव हे पहिल्यांदाच बुलढाण्यात आले. यावेळी ते बंडखोर शिंदे गटात का गेले यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा

रणवीर सिंगला न्यूड फोटोंचं स्वातंत्र्य मग हिजाबला विरोध का? – अबू आझमींचा सवाल

पत्रकारांनी शिंदे गटात सामील होण्याचे कारण जाधवांना विचारले तेव्हा ते म्हणाले, “शिवसेनेत उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे असा कोणताही गट नाही. आम्ही शिवसेना पक्षातच आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारावर, आनंद दिघे यांच्या शिकवणीखाली शिवसेनेची वाटचाल करत आहे. मागील अडीच वर्षा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे हिंदुत्वाच्या अनेक मुद्द्यांना बाजूला ठेवावं लागलं होतं. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झाल्याने शिवसेना हिंदुत्वापासून दूर जात होती असं सर्वसामान्यांनाही वाटू लागलं होतं. त्यामुळेच आम्ही भाजपासोबत नैसर्गिक युती केली,” असं मत यावेळी प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा

अर्जुन कपूर पुन्हा एकदा चर्चेत

शिंदे गटात सामील झाल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात आले. सर्वात आधी त्यांनी सिंदखेड राजा येथे भेट दिली. माँसाहेब जिजाऊ यांचे यावेळी त्यांनी दर्शन घेतले. तिथे उपस्थित सर्व समर्थकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. यावेळी आमदार डॉ. संजय रायमुलकर, माजी आमदार डॉ. शशिकात खेडेकर, युवासेना सहसचिव जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, दिपक बोरकर, तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे, नगराध्यक्ष सतिष तायडे, जि.प.सदस्य पती धनराज शिंपणे, सिंदखेडराजा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss