Thursday, July 4, 2024

Latest Posts

खासदार Prataprao Jadhav यांची लागली वर्णी ; केंद्रीय मंत्रिमंड़ळात मिळाली आयुष मंत्रालयाची जबाबदारी

शिवसेना हा एनडीएमधील सर्वात जुना आणि विश्वासू मित्रपक्ष आहे. नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातून ७ खासदार निवडून आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहे.

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. सदर अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली होती. राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २८ जून रोजी सादर केला होता.

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने विविध विषयांवरील मंत्रिमंडळाच्या विशेष समितींच्या आज घोषणा केली. गुंतवणूक आणि विकास या विषयावरील मंत्रिमंडळाच्या समितीवर शिवसेना खासदार केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) श्री. प्रतापराव जाधव यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या घोषणेनंतर शिवसेना पक्षाचे लोकसभेतील गटनेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrekant Shinde) यांनी खासदार प्रतापराव जाधव यांचे अभिनंदन केले.

बुलढाण्यातून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंड़ळात आयुष मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे केंद्र सरकारमधील एकमेव मंत्री आहेत. खासदार श्री. प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्य मंत्रिपद (स्वतंत्र कारभार) देण्यात आला आहे.

आता केंद्रीय नेतृत्वाने खासदार प्रतापराव जाधव (Pratap Jadhav)यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विशेष समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुंतवणूक आणि विकास या विषय समितीवर पंतप्रधान  नरेंद्र मोदी (Narendra Modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh), गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha), भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala Sitaraman), वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyel), ग्राहक संरक्षण मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi), वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग, रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंग पुरी आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांचा समावेश आहे. या समितीवर प्रतापराव जाधव आणि इंद्रजीत सिंग यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना हा एनडीएमधील सर्वात जुना आणि विश्वासू मित्रपक्ष आहे. नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातून ७ खासदार निवडून आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss