Sanjay Raut : ‘आता मी पुन्हा लढेन’; जामीन मिळताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut : ‘आता मी पुन्हा लढेन’; जामीन मिळताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल शंभर दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत तुरुंगात होते. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राऊत यांना जामीन मिळाल्यामुळे ठाकरे गटाने एकच जल्लोष केला आहे. तसेच राऊत यांना जामीन दिल्याने ठाकरे गटाला मोठं बळ मिळालं. मात्र ईडीनं कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मात्र, कोर्टाने ईडीची ही याचिका फेटाळून लावली आहे. तर आता ईडीनं हायकोर्टाकडे धाव घेतली आहे. दरम्यान, राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

हेही वाचा : 

Sanjay Raut Bail : संजय राऊतांना दिलासा, ईडीची स्थगितीची मागणी कोर्टानं फेटाळली

शिवसेना नेते संजय राऊत यांना आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. त्यामुळे राऊत यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, राऊतांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “न्यायदेवतेवर पुर्ण विश्वास होता. न्यायदेवतेचे आभार मानतो. आता मी पुन्हा लढेन. आता मी कामाला पुन्हा मी सुरुवात करेन.” असा आत्मविश्वास राऊत यांनी जामीन मिळाल्या नंतर व्यक्त केला आहे.

Sanjay Raut Bail : संजय राऊत डरपोक नाहीत, जे डरपोक होते ते पळून गेले ; आदित्य ठाकरे

दरम्यान, ईडीला यामुळं मोठा धक्का बसला होता. ईडीनं या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडं केली होती. मात्र, कोर्टाने ही ईडीची मागणी फेटाळली आहे. त्यानंतर ईडी हायकोर्टाकडे जाणार असलयाचे समोर येत आहे. त्यामुळे संजय राऊत यांना दिलासा मिळाला असला तरी टांगती तलवार आहे.

राऊतांच्या जामीनावर रोहीत पवारांच्या ट्विटची चर्चा तर सुषमा अंधारेंनी दिली पहिली प्रतिक्रिया’ ‘टायगर इज बॅक’

Exit mobile version