spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाण्याचा अधिकार नाही, संजय राऊत तापले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानानंतर मुख्यमंत्र्यांनी (CM eknath shinde) राज्यपालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्व अधिक वाढलं असतं. महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात आहेत, शिवरायांचा अपमान ऐकण्यापेक्षा मरण का आलं नाही? मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हे हतबल सरकार आहे. मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाण्याचा अधिकार नाही. अशी संतप्त भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : 

DSLR देखील फेल होईल iPhone 15 पुढे, डिझाइनसह कमालीचे अपग्रेड पाहून ग्राहक खुश

शिवप्रताप दिनाच्या (Shiv Pratap Day) निमित्त आज किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री पोहचले आहेत. या निमित्त गडावर अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अद्यापही तापलेलं आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून या भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका सुरू आहे. दरम्यान संजय राऊत यांनी, उदयनराजेंचे (Udayanraje bhosale) अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहेत, त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केल्याचे असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले.

पुढे संजय राऊत म्हणाले, बेळगावच्या समन्सला आम्ही वकील पाठवले आहेत. त्यानंतर पुढली तारीख असेल, त्या पुढल्या तारखेला मी उपस्थित राहणार असल्याचे राऊतांनी सांगितलं. कर्नाटक सीमा वादावर सुनावणी झाली तर होईल. त्याची आम्ही सगळेच वाट पाहत असल्याचे ते म्हणाले. सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत, आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? हा मोठा प्रश्न असल्याचे संजय राऊत म्हणाले.

रविना टंडनने येणार ‘या’ कृत्यामुळे येणार अडचणीत

पुन्हा राऊत १ डिसेंबरला कोर्टात हजर राहणार

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावला आहे. या समन्सनुसार राऊतांना १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत यांनी बेळगावात ३० मार्च २०१८ रोजी राऊतांनी प्रक्षोभक भाषण केलं होत, याप्रकरणीच राऊतांना समन्स जारी केला आहे. या समन्सनुसार आता संजय राऊत १ डिसेंबरला कोर्टात हजेरी लावणार आहेत.

Latest Posts

Don't Miss