‘ये झाकी है, पिक्चर अभी बाकी है’ खा.श्रीकांत शिंदेची विरोधकांवर टीका

‘ये झाकी है, पिक्चर अभी बाकी है’ खा.श्रीकांत शिंदेची विरोधकांवर टीका

महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय संघर्ष कधी संपेल हे सांगणे कठीण आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीपासून शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार शाब्दिक युद्ध हे कायम सुरूच आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री २० तास काम करतात, म्हणून विरोधकांच्या डोक्यात खुपतात, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

एमसीएच्या निवडणुकीत कसोटी पटू संदिप पाटील- राजू कुलकर्णी, पवार- शेलार काय करणार?

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त गणेशोत्सव नव्हे तर ज्या प्रकारांनी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले. त्याची विरोधकांनी धास्ती घेतली आहे. हा माणूस दिवसातील २० तास कसे काम करू शकतो, या गोष्टी आता डोळ्यांमध्ये खुपत असल्याचे खासदार शिंदे यांनी म्हटले. ही तर फक्त सुरुवात असून ‘ये झाकी है, पिक्चर अभी बाकी है’ असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

हेही वाचा : 

सुशांतचे ‘ब्रह्मास्त्र’ बॉलीवूडला उद्ध्वस्त करणार… सोशल मीडियावर या पोस्टची चर्चा

राज्यात आलेले सरकार हे बहुमताचे सरकार आहे. इतर लोक काय म्हणत आहेत ते त्यांचे काम आहे. विरोधी बाकावर बसल्यापासून त्यांच्याकडे काहीच उरले नाही.इतकंच नव्हे तर त्यांच्या स्वप्नातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असल्याचे खासदार शिंदे यांनी म्हटले.

सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांवर कौतुकाचा वर्षाव केला होता. यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसोबत एका व्यासपीठावर बसणे हे संकेतांना धरून नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Grandparents Day २०२२: ११ सप्टेंबर रोजी तुमच्या आजी-आजोबांना शुभेच्या देण्यासाठी काही खास कल्पना

Exit mobile version