खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना

शिंदे फडणवीस यांचे सरकार राज्यात आल्या पासून राज्याच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडताना बघायला मिळत असतात.

खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना

शिंदे फडणवीस यांचे सरकार राज्यात आल्या पासून राज्याच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडताना बघायला मिळत असतात. शिंदे फडणवीस सरकारचे काम सध्या जलद गतीने चालू असल्याचे बघायला मिळत आहे. काही काळ संथ गतीने चालू असलेली कामे आता हळूहळू मार्गी लावण्यात येत आहे. त्याचबरोबर काही कामना स्थगिती मिळालेली कामे होती. त्यांना सुद्धा आता मान्यता मिळवून देऊन त्या कामना देखील चालना मिळालेली आपल्याला बघायला मिळते आहे. अशातच महाराष्टाच्या राजकारणातुन सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे कोणत्या कात्रणासाठी दिल्लीला रावण झाले असतील या संदर्भात राजकारणात चर्चाना उधाण आले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे हे नक्की कोणत्या कामासाठी चालले आहेत आणि तिथे जाऊन नक्की ते कोणाची भेट घेणं आहे या संदर्भात राजकीय वर्तुळातून चर्चा होताना बाफघायला मिळत आहे.त्यांचं दिल्लीला जाणे हे आत्ताच्या घडीला मोठी बातमी आहे.त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेची आज सकाळी एक जाहिरात समोर आली. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अव्वल आहेत, असा दावा करण्यात आला आहे. तसेच ‘दिल्लीत मोदी तर महाराष्ट्रात शिंदे’, असं या जाहिरातीत म्हटलं आहे. या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षाही जास्त टक्क्यांचा कौल हा एकनाथ शिंदे यांच्याबाजूने असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासाठी एका सर्व्हेचा दाखल देण्यात आला आहे. त्यानंतर आता वेगळ्या घडामोडी घडत आहेत. आणि या कारणावरून देखील खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीला गेले असावे असा तर्क काढला जात आहे.

विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांच्यात जो वाद झाला त्यावरुन त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. एका पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला कल्याणमध्ये सहकार्य करायचं नाही, असा ठराव स्थानिक भाजप नेत्यांचा झाला होता. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांसमोर येत नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्या घडामोडींनंतर आता श्रीकांत शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. श्रीकांत यांनी आपण वैयक्तिक कामांसाठी दिल्लीला जात असून कोणत्याही नेत्यांना भेटणार नसल्याचं सांगितलं आहे. पण तरीही राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आता खासदार श्रीकांत शिंदे नक्की कोणाला बेतणार आणि तिकडे राजकीय चर्चा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी; २४ तासांत धडकणार चक्रीवादळ

मुंबई, ठाणे ,पालघरसह वसईमध्ये देखील पावसाने लावली हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version