spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राऊतांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका करत म्हणाले, त्या अडाण्याच्या…

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात आहेत. त्यातच टीका करण्याची पातळी देखील खालावताना दिसत आहे. मात्र या दोघांमध्ये भाजपला देखील ओढलं जात असून आज शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे.

खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीचे शब्द वापरात मर्यादा ओलांडली आहे. राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना एकट पाडायचं, शिवसेना संपवायची, शिवसेनेचे नाव पुसून टाकायचं. आणि या **** ४० गद्दारांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा जो धंदा आहे, तो उधळून टाकायचा आहे. शिवसेना फक्त बाळासाहेबांची आहे, उद्धव साहेबांची आहे हे दाखवून देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, असंही राऊत म्हणाले.

महाराष्ट्रला कोणी वाचवलं तर ते शिवसेनेने वाचवलं. आता तुम्ही कोणाची लाचारी करत आहात? तो मराठी आहे का? असे सवाल उपस्थित करत राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा : 

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहुल गांधी कितव्या क्रमांकावर? कोणाचं सहकार्य तर, काहींचा विरोध

पुढे म्हणाले, अमराठी लोकांचे पाय धुवायचे आणि मराठी माणसांबद्दल बोलायचं. ४० गेले १२ खासदार गेले त्याची खंत नाही. एकनाथ शिंदे आणि ४० चोर आज चाकरी करत आहेत.१०५ जणांनी बलिदान दिले आहे. यानंतर मुंबई मिळाली आहे. मुंबई ही महाराष्ट्राचीच राहणार अजुन बलिदान द्यावे लागले तरी चालेल. देश पुर्ण आमचा आहे. पण मुंबई आमची नाही हीच मोठी खदखद आहे असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

Adipurush : प्रभास आणि क्रिती सॅनन पडले प्रेमात?,आदिपुरुषच्या सेटवर वाढली जवळीक

दरम्यान महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून येणारा प्रकल्प गुजरातला पाठवण्याचं पाप शिंदे सरकारने केल्याचं राऊत म्हणाले. यावेळी राऊत यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस सारख्या हुशार आणि अभ्यासू माणसावर दुर्दैवाने वाईट दिवस आले. त्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. त्यामुळेच फडणवीसांना या अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागत असल्याची जहरी टीका राऊत यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ निर्ययामुळे, गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा शिवप्रेमीचा मोर्चा थंडावला

Latest Posts

Don't Miss