खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी हे देशासाठी कलंक आहेत- संभाजी भिडे

खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी हे देशासाठी कलंक आहेत- संभाजी भिडे

नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे संभाजी भिडे नाव प्रसिद्ध आहे. खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी हे देशासाठी कलंक आहेत,अशा शब्दात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांवर जहरी टीका केली आहे. तसेच सर्वधर्म हा गांडुळ विचार असून तो इतिहासाला धरून नसल्याचे मतही भिडे यांनी व्यक्त केला आहे. संभाजी भिडे बुधवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौड समारोप प्रसंगी ते बोलत होते.

समारोपावेळी बोलतांना संभाजी भिडे यांनी आक्षेपार्ह शब्दांत राजकारण्यांवर जोरदार टीका केली आहे. भिडे गुरुजी यांनी खासदार,आमदार आणि लोकप्रतिनिधी देशाला लागलेले कलंक असल्याची घणाघाती टीका केली आहे. सर्वधर्म हा गांडूळ विचार आहे, हा सत्य विचार नसून असत्य विचार आहे, हा इतिहासाला धरून विचार नाही,असे मत व्यक्त करत आपल्या मातृभूमीसाठी जगणारी माणसं पाहीजे आहेत,पण इथेचं बोंब आहे.साधी गोष्ट घ्या,लोक निवडून देतात ,ते आमचे खासदार काय ? आमदार काय, लोकप्रतिनिधी काय ? शरम वाटत नाही. सगळेजण पगार घेतात,भाडोत्री. हे बेकार असून आपल्या लोकशाहीला आणि परंपरेला कलंक आहेत,अशा शब्दांत भिडे गुरुजी यांनी टीका केली.

सांगलीत नवरात्राच्या काळात दुर्गामाता दौडीच आयोजन करण्यात येते. हजारो धारकरी दौडीत सहभागी झाले होते. विजयादशमीच्या दिवशी रिवाजाप्रमाणे शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली. संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ३५ वर्षांपासून सांगलीत दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे दोन वर्षे ही दौड होऊ शकली नव्हती. त्यामुळे यंदा शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

हे ही वाचा:

‘मी थकणार नाही मी झुकणार नाही… ‘, मेळाव्यात पंकजा मुंडेंची तोफ कडाडली

सबा आझादने सोशल मीडियावर शेअर केली तिच्या नव्या चित्रपटाची झलक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version