एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी; तारखेबाबत दिला पर्याय

एमपीएससी (MPSC Exam) आणि बीएड सीईटी परीक्षा (B.Ed CET Exam) एकाच दिवशी आली आहे. २१ ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा या दोन्ही आल्या आहेत.

एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी; तारखेबाबत दिला पर्याय

एमपीएससी (MPSC Exam) आणि बीएड सीईटी परीक्षा (B.Ed CET Exam) एकाच दिवशी आली आहे. २१ ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा या दोन्ही आल्या आहेत. या दोन्ही परीक्षा एकाच तारखेला आल्यामुळे विद्यार्थी नाराज झाले होते आणि त्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र आता यावर सरकारने तोडगा काढला आहे.

संभ्रमात असलेल्यांना परीक्षार्थींना सरकारने पर्याय दिला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि बीएड सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट या एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा २१ ऑगस्टला आहे. तर बीएड सीईटी परीक्षा २१ ऑगस्टपासून तीन दिवस आहे. यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच तारखेला आल्या आहेत. एका परीक्षेला विद्यार्थ्यांना जात येणार नाही, अशी भावना आणि संभ्रम परीक्षार्थींच्या मनात होता. पण सरकारने यावर तोडगा काढला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil) यांनी म्हटलं आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येण्याच्या गोंधळावर तोडगा सांगितला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, एमपीएससी (MPSC Exam) आणि बीएड सीईटी परीक्षा (B.Ed CET Exam) एकत्र देणाऱ्या विद्यार्थ्यांना तारखेबाबत पर्याय दिला जाईल. यासाठी परीक्षार्थींनी त्वरीत सीईटी सेलशी संपर्क साधावा. तेथे तुम्हाला दोन्ही परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल.

 

हे ही वाचा :- 

फोन घ्यायचा विचार करताय ? तर, सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्डेबल फोनचा नवा आविष्कार पहा

आदित्य ठाकरे भाजपाच्या मतांवर निवडून आले, आशिष शेलार यांचे विधान

 

 

 

Exit mobile version