MPSC की निवडणूक आयोग, मुख्यमंत्र्यानी दिले स्पष्टीकरण

एमपीएससी परीक्षेच्या नवीन पेपर पॅटर्न विरोधात विद्यार्थ्यांनी सध्या आक्रमक पवित्रा घेतला आहे. २०२५ पासून नवीन पेपर पॅटर्न लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे.

MPSC की निवडणूक आयोग, मुख्यमंत्र्यानी दिले स्पष्टीकरण

एमपीएससी परीक्षेच्या नवीन पेपर पॅटर्न विरोधात विद्यार्थ्यांनी सध्या आक्रमक पवित्रा घेतला आहे. २०२५ पासून नवीन पेपर पॅटर्न लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. या संदर्भात बुधवारी दि २२ फेब्रुवारी रोजी मुख्यमनातरी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. परंतु ही प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग बोलण्याऐवजी चुकून ते निवडणूक आयोग म्हणाले. त्यामुळे सध्या ते नेटकऱ्यांच्या चांगल्याच निशाण्यावर आहेत. तसेच त्याचा हा व्हिडिओ देखील सोसोहळ मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकताच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निणर्याबाबत चर्चा असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. त्याच्या या प्रतिक्रियांचा व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. यामध्ये बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ही पद्धत २०२५ पासून लागू करण्याची मागणी होती, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिले आहे, कळवले आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. कालही पुन्हा पत्र दिले आहे आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत सरकार सहमत आहे,’ असे ते म्हणाले.

हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरवर पोस्ट केला आणि ‘यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले,’ अशी खोचक टीका केली.

सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून, आता एमपीएससीचा निकालही निवडणूक आयोग देणार वाटते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या व्हिडिओवरून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एमपीएससीच्या प्रश्नावर निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने झाले आहे. नेहमी निवडणूक आयोग, कोर्ट अशा गोष्टी चालू असल्यामुळे असे म्हणले गेले असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना घातल्या तीन अटी

दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा, शिवसैनिकांचा पैसा त्यांना मिळाला पाहिजे…

देवेंद्र फडणवीस यांना काळीज नसेल .. टीका करत सुषमा अंधारे म्हणाल्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version