spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गणेशोत्सवापूर्वी Mumbai Goa Highway होणार आता खड्डेमुक्त्त; Nitin Gadakari यांनी दिले आश्वासन

अपघातात आत्तापर्यंत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. सन २०११ पासून महामार्गाचे काम चालू आहे. २०११ पासून कित्येक लोक अपघातामध्ये मरण पावले आहेत. त्याचे मोजमाप करु शकत नाही. भविष्यात यापुढे अपघात झाले तर त्याची पूर्णतः जबाबदारी ठेकेदाराची राहील. त्यामुळेच गणेशोत्सव सणानिमित्त विविध ठिकाणावरु कोकण वासीय मोठ्या संख्येने कोकणात येणार असल्याने त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी ठेकेदाराने प्रामाणिकपणे लक्ष घातले पाहिजे अशी मागणीही वाहनचालकांकडून तसेच नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्यासाठी रस्ते प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वीच मुंबई गोवा मार्गावरील (Mumbai Goa Highway) खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari) यांनी मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांना दिले. 

मुंबई गोवा राज्य मार्गाच्या (Mumbai Goa Highway) चौपदरीकरणाचे काम गेल्या १० वर्षापासून सुरु आहे. ४७१ कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु करण्यात आले. अद्याप हे काम पूर्ण झाले नसून या कामाला विलंब होत आहे. या राज्य मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी त्यातील अनेक ठीकाणावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या राज्य मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्डे मुक्त करावा, असे निवेदन खासदार रविंद्र वायकर यांनी मंत्री गडकरी यांना दिले. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा राज्य मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहे.

त्याचबरोबर या मार्गावर (Mumbai Goa Highway) बांधण्यात येणारे ट्रामा हॉस्पिटलचे काम लवकर सुरु करून ते पूर्ण करावे, अशी विनंती वायकर यांनी मंत्री नितिन गडकरी यांना यावेळी केली. तसेच डिसेंबरपर्यंत या राज्य मार्गाच्या चौपदरी करणाचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले. मुंबई गोवा राज्य मार्गावरील (Mumbai Goa Highway) भोस्ते घाट येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. भोस्ते व परशुराम घाट येथे भूउत्खलन होत आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी टनेल बांधण्याचे काम करण्यात यावे, अथवा रेल्वे मार्गाला लागून समांतर रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी वायकर यांनी गडकरी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

हे ही वाचा :

Paris Olympics 2024 : आधी Vinesh Phogat आणि आता Antim Panghal; नक्की चाललय तरी काय आणि कुस्तीपटूच का ?

अजितदादांचं Pink Politics उधळणार रंग; महाराष्ट्र जनसन्मान यात्रेला झाला आरंभ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss