मुंबई आहे की ‘डान्सबार’, राज ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई आहे की ‘डान्सबार’, राज ठाकरेंचा हल्लाबोल

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. आज एबीपी माझाच्या वाहिनीवर ‘माझा महाराष्ट्र माझा व्हिजन’ असा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलवण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सुद्धा आज कार्यक्रमासाठी उपस्थित होते. राज ठाकरे या वेळी म्हणाले कि, राजकारण्यांकडून व्हिजन घेण्याऐवजी त्यांना व्हिजन देण्याची गरज आहे, असं स्पष्ट मत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केलं. मुंबईतील सुशोभीकरणाबाबत (Embellishment) राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. “सुशोभीकरण केलंय, पण संध्याकाळी मुंबई आहे की डान्सबार (dance bar) कळत नाही,” असं राज ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते.

काय प्रत्येक वेळेला यायचं आपण एखादी गोष्ट मांडायची. पण मला असं वाटतं की तुमच्या हातामध्ये असलेले जे माध्यम आहे ते माध्यम पॉवरफुल माध्यम आहे. की जे लोक तुमच्या समोर बोलून गेलेले आहेत त्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारावे. मला असं वाटतं तुम्ही समोर उभे करुन ते काय बोलून गेले आहेत आणि त्याचं पुढे काय झालं याचा लेखाजोखा मांडावा. मला असं वाटतं हे झाल्याशिवाय असल्या कार्यक्रमांना अर्थ उरत नाही. आता ही माणसं काय करणार आहेत? असं राज ठाकरे म्हणाले.

“शिक्षणाचे तेच झाले, तेच वैद्यकीय परिस्थितीचे, सगळ्याचा विचका झाला आहे. त्या सगळ्या गोष्टींचा लोड हा शहरांवर येतो आणि शहरांवर आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त पैसे खर्च आता मेट्रो बांधले जातात आणि आपण बेसुमार फक्त खर्च करतो. महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये, बाकीच्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती असेल. कदाचित इतर शहरांमध्ये ठाण्यामध्ये पुण्यामध्ये जाऊ शकत नाही असे रस्ते आहेत. आपण या गोष्टीचा विचार करत नाही आहोत एखादी गाडी घेतली तर गाडी पार्क कुठे होणार आहे याचा विचार करत नाही. टू व्हीलर विकल्या जात आहेत, फोर व्हीलर विकल्या जातात, कुठे पार्क केले जातात माहिती नाही. सरकार सरकारच्या पद्धतीने काम करतंय मग सरकारला काय वाटते हेच ठरत नाही,” असं राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

IND vs NZ 3rd ODI रोहित आणि गिलचे अर्धशतक पूर्ण, भारताची १५० धावांच्या दिशेने वाटचाल सुरू

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला गुजरातमध्ये समर्थन, पहा नेमकं काय झालं

आरोपांना उत्तर कामातून देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version