spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिंदे -ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांचा मोठा निर्णय ! मुंबई पालिकेतील सर्व पक्षांची कार्यालय सील

शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी निर्णय केला आहे. मुंबई महापालिकेतील (Mumbai Muncipal Corporation) सर्वच पक्षांची कार्यालयं सील (Office Seal) करण्यात आली आहे.

शिंदे गट-ठाकरे गटाच्या राड्यानंतर महापालिका आयुक्तांनी निर्णय केला आहे. मुंबई महापालिकेतील (Mumbai Muncipal Corporation) सर्वच पक्षांची कार्यालयं सील (Office Seal) करण्यात आली आहे. आयुक्तांच्या पुढील आदेशापर्यंत सर्वच पक्षांची कार्यालयं तात्पुरती सील करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील (BMC) फक्त सर्व पक्ष कार्यालयच नाही तर विविध समितीच्या अध्यक्षांची दालनं सुद्धा सील करण्यात आली आहेत.

शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि नागपूरच्या विधान भवनात ठाकरे आणि शिंदे गटात पक्ष कार्यालयासाठी राजकीय संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालयं. नवी दिल्लीतल्या संसदेतही दोन्ही गटांच्या खासदारांमध्ये पक्ष कार्यालयासाठी संघर्ष सुरु आहे. आता शिंदे गटानं मुंबई महापालिकेतल्या पक्ष कार्यालयावर ताबा मिळवला आहे.

 

खासदार राहुल शेवाळे, नरेश म्हस्के, यशवंत जाधव, शीतल म्हात्रे आणि गिरीश धानुरकर यांच्यासह शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेत जाऊन शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर आपला हक्क सांगितला. ती बातमी कळताच शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही मुंबई महापालिका गाठली. त्यामुळं शिवसेनेतल्या शिंदे आणि ठाकरे गटातल्या राजकीय संघर्षाचं मुंबई महापालिका हे नवं रणांगण बनले आहे.

शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची आधी भेट घेतली. मग त्यांनी शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दाखल होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला आणि घोषणाही दिल्या. त्यानंतर शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळं त्यांना आवर घालताना मुंबई पोलिसांची मोठी पंचाईत झाली होती. अखेर बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढलं.

समोर आलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या नेत्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर ठाकरे गटाचे नेतेही कार्यालयात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. आम्ही येथे होतो. येथेचं राहणारे, असं ठाकरे गटानं ठणकावूनं सांगितले. आयुक्तांनी मुंबईच्या विकासासाठी चांगले निर्णय घेतले. या निर्णयाला गालबोट लावण्याचं काम करतात, असंही सांगण्यात आलं. शिवसेना कार्यालय आमचंही आहे. घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न झाला. हे खपवून घेणार नसल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्याने देखील प्रतिक्रिया देखील दिली आहे. आम्ही येथे असताना हे आले नाहीत. ते आम्ही असताना आले असतो तर ते मर्द असल्याचं सांगितलं. मुंबई मनपा निवडणुका जवळ आल्यात. कार्यकाळ संपला तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जनता असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं.

 

हे ही वाचा:

Narendra Modi मुळे व्यावसायिक भरभराट? Gautam Adani म्हणाले…

Twitter Down; लॅपटॉप, डेस्कटॉपवर लॉगिनही होत नाहीये, कारणही कळेना

महाराष्ट्रातील पारा घसरला तर देशातील काही ठिकाणी पावसाचा तडाखा, जाणून घ्या कोणत्या भागात काय स्थिती?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss