spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

माझी सुपारी संजय पांडे यांना दिली होती, देवेंद्र फडणवीस

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. आज एबीपी माझाच्या वाहिनीवर ‘माझा महाराष्ट्र माझा व्हिजन’ असा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांना बोलवण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनेक मोठं वक्तव्य त्या ठिकाणी केलं आहे. ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये (Jail ) टाकण्याचं टार्गेट तत्कालीन सीपी संजय पांडे (Sanjay Pandey) यांना दिलेलं, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

फडवीसांच्या तात्कालिन महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Govt) केलेल्या या आरोपानंतर तत्कालीन गृहमंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा फडणवीसांनी मला अटक करण्याचे आदेश वळसे पाटलांचे नव्हते म्हणत सस्पेंस वाढवला आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी माध्यमांना बोलताना सांगितले की, हे मी अतिषय सत्य सांगितलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात कशाही प्रकारे मला कारागृहात टाकण्याचा तसेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होता. याची सुपारी तत्कालिक मुंबईचे पोलिस कमिशन संजय पांडे यांना देण्यात आली होती. त्यांनी प्रयत्न करून पाहिले पण ते यशस्वी झाले नाहीत. यातली काही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांना देखील आहे. फर्स्ट हॅंड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे असेही फडणवीस म्हणाले.

दिलीप वळसे पाटील यांनी हे आरोप फेटाळल्याबद्दल फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की, मी वळसे पाटलांवर कुठलाही आरोपच केलेल नाहीये. हा जो आदेश आला होता तो वळसे पाटलांकडून आलेला नव्हता. तो वरून आलेला होता असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली, त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते.

हे ही वाचा:

आई सेक्स वर्कर आहे म्हणून माझी मुलं सेक्स वर्कर होणार नाहीत, गौरी सावंत यांनीं सांगितलं मन हेलावून टाकणारा तो प्रसंग

मंत्रिमंडळावरून दिल्लीमध्ये अमित शाहांसोबत खलबतं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss