spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सोमय्यांच्या खोट्या आरोपांनी माझ्या सासूचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; किशोरी पेंडणेकर

माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर या सध्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर आहेत. किशोरी पेडणेकर यांनी एसआरए प्रकल्पात घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. या सगळ्याचे कथित पुरावेही किरीट सोमय्या यांनी सादर केले होते. या सगळ्यामुळे किशोरी पेडणेकर अडचणीत आल्याची चर्चा होती. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या सासूबाई श्रीमती विजया पेडणेकर (Vijaya Pednekar) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विजया पेडणेकर यांनी काल ३० ऑक्टोबरला अखेरचा श्वास घेतला. किशोरी पेडणेकर यांच्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या SRA घोटाळ्याच्या आरोपानंतर चौकशी झाली होती. किशोरी पेडणेकर यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे वयोवृद्ध विजया पेडणेकर यांनी धसका घेतल्यामुळे हा मृत्यू झाला असा आरोप आता पेडणेकर कुटुंबीयांनी केला आहे. माझा कुटुंबातील एक बळी घेतला. तरीही मी १ नोव्हेंबरला चौकशीला सामोरे जाणार, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर किरीट सोमय्या यांच्याकडून आरोप केले जात आहेत. यासंबंधीच्या टीव्हीवरील बातम्या माझ्या सासूबाई विजया पेडणेकर यांनी पाहिल्या होत्या. या सगळ्यामुळे त्यांना खूप दडपण येत होते. तुला काही होणार नाही ना, असा प्रश्न त्या सतत मला विचारायच्या. तुम्ही चिंता करु नका, मला काहीही होणार नाही. माझा कायद्यावर आणि यंत्रणांवर विश्वास आहे. मी कायदेशीर लढाई लढेन. मी कोणतंही वावगं काम केलेले नाही, असे मी त्यांना सांगायचे. पण काल त्या अचानक गेल्याने आम्हाला धक्का बसला, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

किरीट सोमय्यांच्या सततच्या आरोपांनंतर आणि दादर पोलीस स्थानकातील चौकशीनंतर, किशोरी पेडणेकरांनी थेट आरोप होत असलेल्या वरळी गोमाता नगरमधील एसआरए इमारतींमध्ये हजेरी लावली. किरीट सोमय्यांकडून किशोरी पेडणेकरांनी येथील सहा गाळे अनधिकृतरित्या हडपल्याचा आरोप झाला होता. याच ठिकाणच्या गाळे धारकांना इथे माझा काही संबंध आहे का असा थेट सवाल करत किशोरी पेडणेकर कुलुप-चावी घेऊन गोमाता नगरमध्ये फिरल्या.

हे ही वाचा :

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ; राज्य सरकार विरोधात निदर्शनं

Bigg Boss Marathi 4 : स्नेहलता वसईकरची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss