spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नड्डाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, जून २०२४ पर्यंत वाढवला कार्यकाळ

जून २०२४ पर्यंत जे.पी. नड्डा हेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची हार झाल्यानंतर जे.पी. नड्डांचं काय होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू असताना आता एक मोठी माहिती समोर आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. जून २०२४ पर्यंत जे.पी. नड्डा हेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुकाही त्यांच्याच अध्यक्षतेखाली लढविण्यात येणार आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकांचे महत्त्व पाहता जे.पी. नड्डांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी सोमवारी भाषण देताना त्यांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना उद्देशून काही वक्तव्य केली होती. ते म्हणाले, तुम्हाला मी सूचना देतो, माहिती घेतो आणि तुम्हाला हे आवडत नसेलही पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि ही माझी जबाबदारी आहे. यापुढेही मी या सूचना देत राहणार. त्यामुळे जे.पी. नड्डा हेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहतील याचे संकेत आधीपासूनच मिळाले होते. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी जे.पी. नड्डा यांच्या पदाचा कार्यकाळ वाढवावा असा प्रस्ताव मांडला होता. ज्याला सर्वांनी अनुमती दर्शवली आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नड्डा यांचा कार्यकाळ वाढवला.

दिल्लीत सध्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन सुरू आहे. त्यात नड्डांना ही मुदतवाढ दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. ही चर्चा अखेर खरी ठरली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत नड्डा यांना या पदावर मुदतवाढ मिळली आहे. आगामी लोकसभा निवडणुका एका वर्षावर आल्या आहेत. त्याआधी याच वर्षात ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होत आहेत. आता या सर्व निवडणुका जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली लढवल्या जाणार आहेत.

हे ही वाचा:

IBPS SO Result 2023 आईबीपीएस एसओ भरती परीक्षेचा निकाल जाहीर, या पद्दतीने करा डाउनलोड

धनुष्यबाण चिन्हांबाबतीत पुढची सुनावणी २० जानेवारीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss