मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपत घेणार निफियू रिओ

नुकत्याच पार पडलेल्या नागालँड च्या निवडणुकीचा निकाल लागला इथे NDPP आणि भाजप ह्यांची सत्ता असणार आहे

मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपत घेणार निफियू रिओ

नुकत्याच पार पडलेल्या नागालँड च्या निवडणुकीचा निकाल लागला इथे NDPP आणि भाजप ह्यांची सत्ता असणार आहे , आता सर्वांचे लक्ष होत्ये कि नागालँडचा नवा मुख्यमंत्री कोण असणार आहे आणि आता त्याचा देखील उलघडा झाला आहे . नागालँड मध्ये पुन्हा निफायू रिओ हेच मुख्यमंत्री पदाची शपत घेतील . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ह्यांच्या निवासस्थानी ह्याबद्दल बैठक झाली त्यात निर्णय घेण्यात आला कि नागालँड चे मुख्यमंत्री पद हे NDPP कडे आणि उपमुख्यंमत्री पद भाजपाकडे असणार आहे. या बैठकी साठी आसामचे मुख्यमंत्र हिमंत बिस्वा सरमा हे देखील उपस्थित होते . संध्याकाळी सर्वाना निफायू रिओ हे मुख्यमंत्री होण्याची खबर देण्यात आली. शनी वारी झालेल्या एनडीपीपी च्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ठेवण्यात आली होती त्यात नेफियू रिओ ह्यांच्या नावावर विधिमंडळ नेते म्हणून शिक्का मोर्तब करण्यात आला . पुन्हा नव्याने मुख्यमंत्री पदाची शपत घेण्यासाठी नेफियू रिओ ह्यांनी शनिवारी नागालँडच्या राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी ह्याबद्दल ट्विट करताना सांगितलं कि माझा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपत आहे मी माझा राजीनामा राज्यपाल गणेशन ह्यांच्या कडे सुपूर्त करत आहे.

नेफियू रिओ होणार पाचव्यांदा मुख्यमंत्री
मंगळवारी मुख्यमंत्रांच्या शपत विधीचा कार्यक्रम होणार आहे. नेफियू रिओ हे नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून चक्क पाचव्यांदा शपत घेणार आहे. एनडीपीपी आणि भाजपने एकूण ६० जागांसाठी निवडणूक लढवली त्यात एनडीपीपी ह्यांच्या २५ तर भाजपच्या २ जागा निवडून आल्या आणि बहुमतासाठी लागणार ३१ चा आकडा त्यांनी पार केला आणि आपले सरकार स्थापन केले ,ह्या आधी एनडीपीपी ह्यांच्या १८ तर भाजप ह्यांच्या १२ जागा आल्या होत्या म्हणून २०१८ मध्ये देखील त्यांचाच राज्य होत. तेव्हाही नागालँडचे मुख्यमंत्री म्हणून नेफियू रिओ ह्यांचीच निवड झाली होती.

तीन शपथविधी सोहळे.
नागालँड आणि मेघालाय्चा शपथविधी सोहळा ७ मार्चला मंगळवारी होणार असून त्रिपुरा चा शपत विधी सोहळा बुधवारी ८ मार्चला होणार आहे. मेघालय आणि नागालँडचा शपथविधी सोहाला एकाच दिवशी असल्याने मेघालाय्चा ११ वाजता आणि नागालँडचा १ वाजून ४५ मि . पार पडणार आहे. या तीनही शपत विधींना भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे खास उपस्थित राहणार आहे.

हे ही वाचा :

ठाण्यात महिला दिनाचे औचित्य साधून सायकल राईडचे आयोजन, २५० हून अधिक महिलांनी घेतला सहभाग

Holi 2023, रसायनयुक्त रंग टाळा आणि बनवा घरच्या घरी नैसर्गिक रंग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version