spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nagpur Car Accident: Sanket Bawankule गाडी चालवत असता तर Congress पक्ष… काँग्रेस आमदाराचे मोठे वक्तव्य

Nagpur Car Accident: नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याचे नाव समोर येत आहे, यामुळे आता राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून भाजपला (BJP) लक्ष केले आहे. शिवसेना उबाठा नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी यावरून आधीच भाष्य करत चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. नागपूर पोलिसांनी यावर पत्रकार परिषद घेत अपघातातील गाडी जरी संकेत बावनकुळे यायची असली तरी अपघाताच्या वेळी ते गाडी चालवत नसल्याचे सांगितले आहे. आता काँग्रेसचे (Congress) आमदार विकास ठाकरे (Vikas Thakre) यांनी यावर भाष्य केले असून, ‘जर संकेत बावनकुळे गाडी चालवणारे असते तर कॉंग्रेस पक्ष शांत बसला नसता,’ असे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले विकास ठाकरे?

नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी या प्रकरणावरून भाष्य केले आहे. यावेळी ते म्हणाले, “नागपूरमध्ये जो अपघात झाला त्यामध्ये संकेत बावनकुळे हे गाडी चालवत होते अशा चर्चांना उधान आले होते. मी पोलीस खात्याला सूचना केल्या होत्या की माझ्या मतदारसंघातील घटना आहे यामध्ये खरं तथ्य काय आहे हे शोधा. काल पोलीस यंत्रणेने तपास केला, सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्यामध्ये असे समजले की संकेत बावनकुळे गाडीमध्ये बसले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी चालवत होता सोबत आणखी एक मित्र होता. गाडीवर नियंत्रण नसल्याने ही घटना घडली आहे, ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेतून नेत्यांच्या मुलांनी काहीतरी बोध घ्यावा, नेत्यांनी मुलांना समजवावे. राजकीय माणूस असला आणि त्याच्या मुलाने काही केले की त्याचे राजकारण होते,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “काल दिवसभर मी पोलीस यंत्रणेसोबत होतो, रात्री दोन वाजता सुद्धा विचारले की यात काय कारवाई केली? गाडी चालवणाऱ्याला अटक केली आहे, संकेत बावनकुळे यांची गाडी जप्त केली आहे त्यांचे स्टेटमेंट घेतले आहे. नेत्याचा मुलगा असो किंवा कोणीही असू द्या, दोषीवर कारवाई झालीच पाहिजे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. जर गाडी चालवणारे संकेत बावनकुळे असते तर कॉंग्रेस पक्ष शांत बसला नसता. ही माझ्या मतदासंघातील घटना असल्यामुळे इतर नेत्यांपेक्षा जास्त लक्ष देणे माझे काम आहे. जो गाडी चालवत होता त्याने मद्य प्राशन केले होते असा रिपोर्ट आला आहे,” असे ते म्हणाले.

अपघातातील गाडी संकेत बावनकुळेंचीच; नागपूर पोलिसांचा दुजोरा

पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली. ते म्हणाले, “अपघातात वापरलेली गाडी ही संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे, ते त्या गाडीचे मालक आहेत. कारमध्ये तीन लोकं होते, अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार आणि संकेत बावनकुळे हे गाडीत होते. तिघांचीही चौकशी केली आहे, त्यात गाडी चावणारा अर्जुन हावरे याला अटक केली होती. पण नंतर त्याला बेल मिळाली. संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता. अर्जुन आणि रोनित या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे, अर्जुन आणि रोनित हे मद्य प्राशन करून होते. गाडी जेव्हा जप्त केली तेव्हा नंबर प्लेट होता,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Nagpur Hit and Run Case: Chandrashekhar Bawankule यांच्या परिवाराचा संबंध नाहीये मग लपवाछपवी का चाललीय? :Sanjay Raut

BJP चा अंतर्गत सर्व्हे आला समोर लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज; Rohit Pawar यांचा दावा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss