spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नागपूरकरांसाठी आज ऐतिहासिक दिवस, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार नागपूर मेट्रो फेज-२चं भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) रविवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी ७५,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला (Vande Bharat Express Train) पंतप्रधान मोदी हिरवी झेंडा दाखवण्यात आला. यासोबतच नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro) दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी करणार आहेत.

याशिवाय नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या ‘समृद्धी महामार्ग’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. एवढेच नाही तर ते नागपुरातील मिहान परिसरात असलेले ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) लोकांना समर्पित करणार आहेत. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी विदर्भातील एका सार्वजनिक कार्यक्रमात १,५०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण करतील.

हेही वाचा : 

PM मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळासह, अनेक ७५,००० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशनवरुन पंतप्रधान मोदी यांनी खापरी पर्यंत नागपूर मेट्रोने प्रवास करत केला. यानंतर मोदी काहीच क्षणातच खापरी मेट्रो स्थानकावर पोहचणार आहे. त्यानंतर एम्सच्या मुख्य कार्यक्रमातून पंतप्रधान मंचावरून भारतीय रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्प, अजनी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आणि बाराशे एचपीच्या लोकोमोटीव्ह सर्व्हिस सेंटर चे उद्घाटन करणार आहे. यासोबतच नागपूर मेट्रो रेल परियोजनाच्या फेज १चं औपचारिक लोकार्पण आणि फेज २चं भूमिपूजन करणार आहे, तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) नागपुर चे राष्ट्राला समर्पण करणार आहेत. यासोबतच सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (म्हणजेच सीटीएस) चंद्रपूर, महाराष्ट्राचे लोकार्पण करतील. यानंतर नागपूर महानगरपालिका तर्फे नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (samruddhi highway) महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग गेमचेंजर ठरणार आहे. विदर्भ, मराठवाडा भागात औद्योगिक क्रांती करणारा ठरेल असे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

Dayanand Shetty : CID टिव्ही शो मधील प्रसिद्ध कलाकारासाठी आज खास दिवस

Latest Posts

Don't Miss