नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी ५२० किमीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी ५२० किमीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

राज्याची राजधानी मुंबई (Mumbai) आणि उपराजधानी नागपूरला (Nagpur) जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचं आज उद्घाटन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते आज हे लोकार्पण पार पडलं. नागपूर ते मुंबई असा ७०१ कि.मी. लांबीच्या या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा टप्प्या सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला करण्यात आला आहे. मुख्य कार्यक्रम स्थळी वायफळ टोल नाक्यावर पंतप्रधानांच्या ताफ्याचे आगमन झाले आहे. याठिकाणी ढोल पथकाने वादनाद्वारे पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत.

हेही वाचा : 

नागपूरकरांसाठी आज ऐतिहासिक दिवस, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार नागपूर मेट्रो फेज-२चं भूमीपूजन

समृद्धी महामार्गवर (Samruddhi highway) हा राज्यातील सर्वात मोठा चौक आहे. नागपुरात जिथून समृद्धी महामार्ग सुरु होतो, तिथे हा ‘समृद्धीचा माईल झिरो’ चौक प्रवाशांचं या महामार्गावर स्वागतासाठी सज्ज आहे. १८ एकर क्षेत्रावर पसरलेल्या हा चौक. ७० हजार ६८४ चौरस मीटर क्षेत्रफळ या चौकाने व्यापलंय. ३६ चौरस मीटरचं लॉन, रंगीबेरंगी झाडं अन् डोळ्यांना दिपवणारी रोषणाई, अशा अनेक वैशिष्ट्यांसह राज्यातील सगळ्यात मोठा चौक सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा आहे.

PM मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळासह, अनेक ७५,००० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी

वेगवेगळ्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आणि भूमीपूजनासाठी पंतप्रधान मोदी सकाळीच नागपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला.

Exit mobile version