Monday, July 1, 2024

Latest Posts

तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही सरसकट कर्ज माफ करा: Nana Patole

काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (सोमवार, २४ जून) माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि सामान्य शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.

काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (सोमवार, २४ जून) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, राज्य सरकारवर (Maharashtra Government) जोरदार टीका केली. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि सामान्य शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाच्या दरात वाढ करावी तसेच तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा राज्य सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “महाराष्ट्रातील भाजपा प्रणित सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. विविध राज्यात शेतकऱ्याच्या दुधाला ४५ रुपया पर्यंत भाव मिळत आहे परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला फक्त २७ रुपये भाव मिळतो आणि हेच दूध अमूल व इतर दूध कंपन्यांकडून ग्राहकाला ५५ ते ६० रुपये प्रति लिटर विकले जात आहे. राज्य सरकारने तातडीने यात लक्ष घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले, “श्वेतक्रांतीमध्ये ज्या दुध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे त्यांनाच राज्यातील भाजपा-शिंदे सरकार लुटत आहे. गाई, म्हशींचे खाद्य व त्यांच्यावर होणाऱ्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे, त्याप्रमाणात दूध खरेदी दर मात्र कमी आहेत. हे दर वाढवून देऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी,” असे नाना पटोले म्हणाले.

तेलंगणा राज्यात काँग्रेस सरकारकडून शेतकरी कर्जमाफी करण्यात आली. याबाबत बोलताना ते म्हणाले, “काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे सरसकट २ लाख रुपयांचे कर्ज माफ केले आहे. २७ जूनपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत असून भाजपा शिंदे सरकारनेही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा या अधिवेशनात करावी,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

हे ही वाचा

Manoj Jarange Patil यांना शिक्षणाची गरज: Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal तलवार काढण्याची धमकी देत असेल तर… Manoj Jarange Patil आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss