नाना पाटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला हल्लबोल

नाना पाटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला हल्लबोल

दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर यंदाही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उत्साहात पार पडत आहे. यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा १२ जून रोजी आली. माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील केवळ ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचं देवस्थानाने ठरवलं आहे. तशी विनंती दिंडी मालकांना आणि फडकऱ्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली आहे. असं असताना काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे.

तेव्हाच माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यादरम्यान या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठी चार्ज केला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर टीका करू लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.


नाना पटोले यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून ट्विट केले आहे . त्या ट्विट मध्ये त्यांनी असे नौमूद केले आहे की , शेकडो वर्ष चालत आलेल्या या वारकरी परंपरेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने गालबोट लावलं आहे. ज्या पद्धतीने भोळ्याभाबड्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज करवण्यात आला. त्या घटनेचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. वारी ही महाराष्ट्राची पुरोगामी पंरपरा आहे, या परंपरेनं सगळ्या धर्माच्या माणसांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचं काम वारकऱ्यांनी केलं. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं. वारकरी परंपरेनं हे काम केलं. असं देखील नाना पाटोळे यांनी सांगितले. त्याचबरोबर वर्षानुवर्षे चालत असलेल्या परंपरेला संपवण्याचं पाप जातीवादी सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर सुरू झालं. या परंपरेला सरकारने गालबोट लावण्याचं काम केलं. या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. त्यामुळे थोडी लाज लज्जा असेल तर या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो.

हे ही वाचा:

Sharad Pawar यांना धमकी देणारा आरोपी गजाआड!

शिंदे गट आणि भाजपमध्ये खटके उडण्यास सुरवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version