PM Narendra Modi, Amit Shah यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा फायदा महाविकास आघाडीलाच: Nana Patole

PM Narendra Modi, Amit Shah यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा फायदा महाविकास आघाडीलाच: Nana Patole

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात ठिकठिकाणी दौरे, सभा, बैठका आणि यात्रा पार पाडल्या जात आहेत. अश्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावरून आता काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाष्य करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

गृहमंत्री अमित शाह आज (मंगळवार, १ ऑकटोबर) मुंबई दौऱ्यावर आहेत. यावरून नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल,’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राकडे एटीएम म्हणून पाहतात. हे त्यांना पैसे देणारे एटीएम मशीन वाचवण्यासाठी ते शेवटचा प्रयत्न करत आहेत. परंतु नरेंद्र मोदी व अमित शाह जेवढे जास्त महाराष्ट्रात येतील त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल,” असेही नाना पटोले म्हणाले.

राज्यातील बेपत्ता ६४ हजार बहिणींचे काय झाले? नाना पटोलेंचा सवाल

नाना पटोले यांनी राज्यातील महायुती सरकारवार याचवेळी चांगलीच आगपाखड केली. ते म्हणाले, “भाजपा-शिंदे सरकार लाडकी बहिणी योजनेचा मोठा गवगवा करत आहे. त्यासाठी जाहिरबाजी करून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात एका वर्षात ६४ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत. यावर सरकारने खुलासा करावा. खरेच या सरकारला बहिणी लाडक्या आहेत का? का फक्त मतांसाठीच त्यांना लाडकी बहीण दिसत आहे. महिला बेपत्ता प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले असता राज्य सरकारने त्याचे उत्तर देणे टाळले तसेच बेपत्ता महिलांचा प्रश्न जेव्हा जेव्हा विधानसभेत मांडला तेव्हा राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी पळ काढला.”

ते पुढे म्हणाले, “सरकार लाडकी बहीण म्हणते आणि भंडाऱ्यामध्ये डब्बे वाटपाच्या कार्यक्रमात महिलांवर पोलीस लाठीचार्ज करतात. महिलांना मारण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला आहे का? भाजपा शिंदे सरकार हे महिला विरोधी आहे, महिलांवर अत्याचार करणारे सरकार आहे. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार शेतकरी विरोधी आहे.”

“राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी आहे, हे सरकार धनदांडग्यांचे आहे. राज्यात सगळीकडे दुष्काळ आहे, अतिवृष्टीमुळे धान, कापूस, फळभाज्या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. सरकार सर्वे करत नाही, सोयाबीनला ४ हजार भाव दिला जात आहे. मविआ सरकार असताना त्यावेळी विरोधी पक्षात असलेला भाजपा आंदोलन करून सोयाबीनला ६ हजार रुपयांचा भाव मागत होता. डिझेलचे भाव वाढले आहेत, खतांचा भाव वाढला, बी बियाणे महाग झाले पण सोयाबीनचा भाव मात्र वाढला नाही. शेतकरी संकटात आहे त्यातूनच तरुण शेतकऱ्याने सोयाबीन मंत्रालयासमोर टाकून सरकार विरोधातील राग व्यक्त केला,” असेही नाना पटोले म्हणाले.

हे ही वाचा:

व्होट जिहादमुळे लोकसभेत पराभव, Devendra Fadnavis यांचा मोठा दावा

Devendra Fadnavis यांनी ‘व्होट जिहाद’ हा शब्द वापरणे म्हणजे संविधानाचा अपमान; Congress नेत्याचा जोरदार हल्लाबोल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version