Saturday, July 6, 2024

Latest Posts

OBC लोकांचे मतांमध्ये वापर करण्याचे काम BJP करत आहे, Nana Patole यांचा घणाघात

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (गुरुवार, १३ जून) माध्यमांशी संवाद साधतात विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) टीका करत, "भाजपच्या सान्निध्यात जे लोक आली मग तो ओबीसी (OBC) चेहरा असेल तर त्याला टार्गेट केले जाते. ओबीसी लोकांचे मतांमध्ये वापर करण्याचे काम भाजप करत आहे," असे वक्तव्य केले.

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (गुरुवार, १३ जून) माध्यमांशी संवाद साधतात विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) टीका करत, “भाजपच्या सान्निध्यात जे लोक आली मग तो ओबीसी (OBC) चेहरा असेल तर त्याला टार्गेट केले जाते. ओबीसी लोकांचे मतांमध्ये वापर करण्याचे काम भाजप करत आहे,” असे वक्तव्य केले.

यावेळी नाना पटोले म्हणाले, “भाजपच्या सान्निध्यात जे लोक आली मग तो ओबीसी चेहरा असेल तर त्याला टार्गेट केले जाते. ओबीसी लोकांचे मतांमध्ये वापर करण्याचे काम भाजप करत आहे. ज्या भुजबळांना (Chhagan Bhujbal) अडीच वर्षे जेलमध्ये टाकलं होतं त्यांना आता यांनी सोबत घेतले आहे. त्यावेळेस भुजबळ डाकू होते आता ते संन्यासी झाले आहेत.”

पुढे ते म्हणाले, “फडणवीस (Devendra Fadnavis) काय काय करु शकतात व नागपूरात घटना घडली त्याचा आधार घेऊन कदाचित ते माजी गृहमंत्री असल्याने माहिती आहे म्हणून बोलले. मोदी यांची शपथविधी होताच आतंकवादी यांनी हल्ला केला. सरकार आल्यास अग्निविर आम्ही बंद करू, जर मोदी सरकारला वाटत असेल तर ठीक आहे, आमची अग्निविर बंद झाली पाहिजे ही भूमिका काँग्रेसची आहे.”

यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरदेखील टीका केली. ते म्हणाले, “संजय राऊत काही पण बोलू शकतात, आम्ही योग्य वेळी बोलू. नेतृत्व कोण करेल हे वेळ सांगेल सत्तेतील सरकार हकलने महत्वाचं काम आहे. सरकार सत्तेतून काढायचे आहे, लूट चालली आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) इंडिया आघाडीला (INDIA Alliance) बहुत मिळाले नसले तरीही महाराष्ट्रात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) चांगली कामगिरी केली आहे. आता आगामी महाराष्ट विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडी आणि महायुती (Mahayuti) तयारीला लागल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकांमधील निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीतदेखील चुरशीच्या लढती होणार आहेत.

हे ही वाचा:

राज्यसभेसाठी Sunetra Pawar यांचं नाव असल्याने Chhagan Bhujbal यांची नाराजी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्शन मोडवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss