BJP च्या नेत्यांना सत्तेचा माज चढलाय, लोकसभेला कुबड्यांवर सत्ता मिळवलीत, आता विधानसभेला कुबड्याही मिळणार नाही: Nana Patole

BJP च्या नेत्यांना सत्तेचा माज चढलाय, लोकसभेला कुबड्यांवर सत्ता मिळवलीत, आता विधानसभेला कुबड्याही मिळणार नाही: Nana Patole

शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena) आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी काँग्रेस (Congress) नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावर टीका करत राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावरून विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असतानाच आता भाजप (BJP) खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. अनिल बोंडे यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा दाखला देत ‘राहुल गांधी जीभ छाटू नये पण जिभेला चटके द्यायला हवे,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी अनिल बोंडेंवर चांगलीच आगपाखड केली आहे.

नाना पटोले यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य करत “तुमच्या पक्षातल्या नेत्यावर कारवाई करणार की आताही मूग गिळून गप्पच बसणार?” असा सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करत भाजपवर चांगलीच आगपाखड केली आहे. ते यावेळी म्हणाले, “भाजपच्या नेत्यांना सत्तेचा माज चढला आहे. भाजपचा खासदार डॉ. अनिल बोंडे याला लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल कोणती भाषा वापरायची याची अक्कल नसावी. बुलढाण्याचा शिंदेंचा आमदार संजय गायकवाड, अक्कल नसलेला, गुंड प्रवृत्तीचा माणूस, त्याला आमदार म्हणावं का असाही प्रश्न पडतो. पण राज्यसभेचे खासदार असलेल्या अनिल बोंडेंसारख्या सुशिक्षित माणसानं पण राहुल गांधींविषयी बोलताना तमा बाळगू नये.. म्हणजे भाजपच्या नेत्यांमध्ये मस्तवालपणा ठासून भरला आहे हे स्पष्ट होते.”

पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ते म्हणाले, “बघा तुमच्या पक्षातल्या नेत्याची भाषा, कारवाई करणार की आताही मूग गिळून गप्पच बसणार? याआधीही तरविंदरसिंह मारवाहनं पक्षाचा झेंडा हाती घेऊन राहुल गांधींना थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. तर दुसऱ्यांदा चक्क केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी राहुल गांधींचा उल्लेख दहशतवादी म्हणून केला होता. तेव्हाही आपलं तोंड शिवलं होतं. आपण काहीही न बोलणं हे आपलेही संस्कार दाखवतात. आज तरी बोलणार का? नाही बोललात तर एवढं लक्षात ठेवा… लोकसभेला कुबड्यांवर सत्ता मिळवलीत, महाराष्ट्र विधानसभेला कुबड्याही मिळणार नाही अशी परिस्थिती मतदारराजा आपली करून ठेवेल. #ये_जनता_है_सब_जानती_है” असे ते यावेळी म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) अमेरिका दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात आरक्षणविषयक प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ‘जेव्हा योग्य वेळ येईल, देशात समानता येईल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल. सध्या ती योग्य वेळ नाही,’ असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानावर विरोधकांकडुन चांगलीच आगपाखड करण्यात आली. भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींविरुद्ध आंदोलनेदेखील करण्यात आली. अश्यातच सत्ताधारी नेत्यांकडून राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह विधाने करण्यात आली होती. भाजप नेता आणि माजी आमदार तरविंदर सिंह मारवाह (Tarwinder Singh Marwah) यांच्याकडून खुलेआमपणे राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देण्यात अली होती. तसेच राज्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी “राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. यानंतर अनिल बोंडे यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा दाखला देत ‘राहुल गांधी जीभ छाटू नये पण जिभेला चटके द्यायला हवे,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता अनिल बोंडे यांच्या वक्तव्याने या वादात आणखी भडका उडण्याची शक्यता आहे.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version