spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सत्तेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वृत्ती: Nana Patole

मालवण येथील राजकोट (Rajkot) या ठिकाणच्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Chhatarpati Shivaji Maharaj Statue Collapse) राज्यातील महायुती सरकारविरुद्ध (Mahayuti Government) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज १ सप्टेंबर रोजी “जोडे मारो आंदोलन” (Jode Maro Andolan) पार पडत आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत या मोर्चाचा मार्ग ठरवण्यात आला आहे. याबाबत काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपस्थित आंदोलकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करत शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सत्तेत आल्यावर अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वृत्ती असल्याचे म्हंटले आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले यांनी यावेळी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही. राज्यात आणि देशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची आणि सतेत आल्यावर त्यांचा अपमान करायचा ही भाजपची पेशवाई वृत्ती आहे,” असा घणाघात त्यांनी यावेळी केला.

जोडे मारो आंदोलनात कोणाचा सहभाग?

या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील इतर प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे. या आंदोलनासाठी मुंबईसह राज्यातील इतर भागांमधून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

महायुती (Mahayuti) कडूनही आंदोलनाची हाक

आज हुतात्मा चौक (Hutatma Chowk) ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती मात्र तरीही मविआकडून हे आंदोलन करण्यात आले. याशिवाय मविआच्या आंदोलनाला महायुतीने आंदोलनातूनच उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) च्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या जोड्या मारो आंदोलनाच्या निषेधार्थ आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात दादर परिसरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. वेडे वटवटराव, मुंग्या राऊत, करामती काका, पेंग्विन राव, नाना तळीराम अशा आशयाचे फलक हातात घेऊन विरोधकांना प्रत्युत्तर देत भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन केले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss