spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नकली वाघनखांचे प्रदर्शन: Nana Patole

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज (शनिवार, २० जुलै) पत्रकारांशी संवाद साधला. काल (शुक्रवार, १९ जुलै) सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे (Waghnakh)आणि इतर शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावरून महायुती सरकारवर (Mahayuti Government) जोरदार ताशेरे ओढत, “निवडणुकीच्या तोंडावर छत्रपतींच्या नावाने नकली वाघनखे आणून त्याचे प्रदर्शन करण्याचा महाभ्रष्टयुती सरकार अयशस्वी प्रयत्न करत आहे,” असे वक्तव्य त्यांनी केले.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, “महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे म्हणून जे कार्यक्रम केला पण ही वाघनखे महाराजांची नाहीत. इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी लंडन म्युझियमला पत्र पाठवून त्याची माहिती घेतली असता म्युझियमने ते स्पष्ट केले आहे. असे असतानाही महायुती सरकारने जनतेचा पैसा खर्च करून सोहळा केला. ज्या लोकांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचे जाहीर करुन २०१७ मध्ये जलपूजनही केले ते स्मारक अजून झालेले नाही. हेच लोक शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात सर्वात पुढे होते. या लोकांनी छत्रपतींचा मानाचा जिरेटोपही नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवाजी महाराजापेंक्षा नरेंद्र मोदी श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. जगात अनेक राजे झाले पण छत्रपतीपद फक्त शिवाजी महाराजांचेच आहे. निवडणुकीच्या तोंडावर छत्रपतींच्या नावाने नकली वाघनखे आणून त्याचे प्रदर्शन करण्याचा महाभ्रष्टयुती सरकार अयशस्वी प्रयत्न करत आहे,” असेही ते म्हणाले.

याआधीही नाना पटोले यांनी महायुतीवर वाघनखांवरून टीका केली होती. त्यात ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाला निवडणुकीतच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. आता विधानसभा निवडणूक असल्याने शिवाजी महाराजांची वाघनखे आणल्याचा देखावा करत आहेत. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत हे इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच महापुरुषांचा अपमान भाजपाच्या नेत्यांनी केला. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी, भाजपाचे मंत्री व नेत्यांनी महापुरुषांचा सातत्याने अवमान केला हे राज्यातील जनता विसरलेली नाही. छत्रपतींचे भव्य स्मारक अरबी समुद्रात करण्याची गर्जना करुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन केले पण अद्याप स्मारकाची एक वीट रचली नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी करणार? याचे उत्तर भाजपाने आधी द्यावे,” असेही नाना पटोले म्हणाले.

हे ही वाचा:

Ladki Bahin Yojana: विरोधकांकडून पहिल्यापासूनच योजनेला विरोध, जे टीका करतात तेच महिलांचे फॉर्म भरतायेत: Aditi Tatkare

Ghatkopar Hoarding Case: Kaisar Khalid यांच्यावर IPC 304A अंतर्गत कारवाई व्हावी: Kirit Somaiya

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss